Manoj Parab Revolutionary Goans Dainik Gomantak
गोवा

रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे गोमंतकीयांसाठी आणखी एक आश्वासन

रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षाने देखील मतदारांना (Voters) आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासणे दिली आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष प्रचार करत आहेत. सत्तेत येणासाठी सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आश्वासने देत आहेत. रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षाने देखील मतदारांचे (Voters) मन वळवण्यासाठी विविध आश्वासने दिली आहेत. (Revolutionary Goans News Update)

त्यांच्या नव्या आश्वासनात रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पार्टीने (Revolutionary Goans) राज्यातील शेतकाऱ्यांकडे (Farmers) लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या आश्वासनानुसार, सत्तेत आल्यास ते 2030 पर्यंत गोव्याला 100% सेंद्रिय उत्पादक राज्य बनवण्याचा प्रयत्न करतील. याचबरोबर 12 तालुक्यांमध्ये कृषी प्रशिक्षण केंद्रे उभारली जातील आणि राज्यात विविध कृषी व्यवसाय आणले जातील.

रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाकडून देण्यात आलेली काही आश्वासने

1. सामायिक लेखी परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतली जाईल. त्याची तारीख आगाऊ जाहीर केली जाईल. यात विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल, आणि एका परीक्षेतून विविध पदांसाठी निवडप्रक्रिया राबवली जाईल.

2. लेखी परीक्षेत मेरीटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याची सामायिक मुलाखत घेतली जाईल. ज्यामुळे ज्या जागांवर भरती करायची आहे तेथील गर्दी टाळता येईल आणि बोलावलेल्या उमेदवानांनाच

3. प्रत्येक मुलाखतीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाईल. मुलाखतीनंतर मिळालेले गुण लगेच विद्यार्थ्याला सांगितले जातील.

4. प्रश्नपत्रिका फोडण्याचे प्रकार टाळण्यासाठी वेगवेगळे प्रश्वपत्रिका संच बनवले जातील, आणि परीक्षेवेळी कोणताही संच निवडला जाईल. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी कडक शिक्षेची तरतूदही केली जाणार.

5. नोकरीमध्ये फक्त गोव्यातील मूळ नागरिकांनाच संधी दिली जाईल, गोव्याबाहेरील लोकांना नोकरीमध्ये संधी नसेल.

6. तसेच गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन केंद्रे उभारणार. कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण हे बंधनकारक करणार.

7. सरकारी नोकरीच्या तयारीसाठी कोचिंग सेंटर स्थापन करणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT