Japanese Tourist Looted In Goa
Japanese Tourist Looted In Goa Dainik Gomantak
गोवा

Japanese Student in Goa: 'त्या' जपानी पर्यटकाला लुबाडणाऱ्यांकडून आणखी एका जपानी विद्यार्थ्याची फसवणूक

Akshay Nirmale

Japanese Student in Goa: काही दिवसांपूर्वी एका जपानी नागरिकाला काही लोकांनी मिळून सुमारे ९ लाख रूपयांना लुबाडले होते. तात्सुकी असे या जपानी पर्यटकाचे नाव आहे. त्याने ट्विटरवरून त्याची कैफियत मांडल्यानंतर हणजुण पोलिसांत पोलिसांनी रॉनी, राजू व इतर दोन अज्ञात अशा चार संशयितांविरोधात गुन्हा नोंद झाला होता. त्यापैकी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, आता याच लुटारूंनी गोव्यात आणखी एका जपानी विद्यार्थ्याला लुबाडल्याचा दावा तात्सुकी याने केला आहे. तात्सुकी याने याबाबत ट्विट केले असून त्यामध्ये गोवा पोलिसांना टॅग केले आहे.

तात्सुकी याने नव्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला लुबाडणाऱ्या लोकांनीच आणखी एका जपानी विद्यार्थ्याला लुटले आहे. २५ आणि २६ जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांला या लोकांचा संशय आला. त्याने माझे युट्युब चॅनेल पाहिल्यावर त्याने मला त्याला आलेल्या अनुभवाबद्दल माहिती दिली.

तात्सुकी याने एक महिन्यापुर्वीच गोव्यात त्याच्या झालेल्या फसवणुकीबाबत स्वतःच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तात्सुकी हा गोव्यात पर्यटनासाठी 29 डिसेंबर रोजी आला होता.

यावेळी काही जणांनी त्याला पोलिस असल्याचे भासवत वाडी शिवोली येथील फ्लॅटवर नेले. त्याला दमदाटी आणि मारहाण करून त्याची 9.43 लाखांची लुबाडणूक केली. त्यानंतर वारंवार त्याला धमकी देऊन गोव्याबाहेर पाठवले.

तात्सुकीने याबाबत ट्विटरवरून पोस्ट करत कैफियत मांडली. माझे पैसे परत मिळावेत यासाठी मला पाठिंबा द्या, अशी विनंती त्याने पोस्टमधून केली. अखेर दोन महिन्यानंतर रविवारी याप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंद केला. आणि आता तिघांना अटक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa And Kokan Today's Live News: पेडणे खून प्रकरण; आजगावकर यांचा सखोल चौकशी करण्याची मागणी

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

Lairai Devi jatra 2024 : ‘लईराई’चा कौलोत्सव अभूतपूर्व उत्साहात; शिरगावात भक्तिमय वातावरण

Cashew Production Declined: काजू पीक घटले; दारूभट्ट्या थंडावल्या, हंगाम अंतिम टप्प्यात

Goa Cashew Agriculture : गोव्यातील काजूचे प्रस्‍थ

SCROLL FOR NEXT