Goa Carnival 2023: यंदा का होतोय कार्निव्हलला विरोध? विजय सरदेसाईंनी व्यक्त केली शंका

कार्निव्हल ही गोव्याची ओळख
MLA Vijay Sardesai
MLA Vijay Sardesai Dainik Gomantak

Vijay Sardesai: कार्निव्हल हा लोकांचा उत्सव आहे. आपली ओळख आहे, आपली परंपरा आहे. पण यावर्षी सरकारमधून अचानक कार्निव्हलला विरोध का सुरू झाला आहे? असा सवाल गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.

MLA Vijay Sardesai
Goa Bribery Case: 'एटीएस'च्या 5 पोलिसांची कॅसिनो व्यापाऱ्याला लाचेसाठी धमकी...

आ. सरदेसाई म्हणाले की, यंदा कार्निव्हलमध्ये फोंडा येथील चित्ररथ आणि परेड का नाकारण्यात आली. कार्निव्हल हा आपल्या अनोख्या संस्कृतीचा एक भाग आहे. कार्निव्हल हा गोव्याची परंपरा आणि येथील ओळख आहे. कार्निव्हल ही गोमंतकीय ओळख आहे.

हे गोयंकारपण आहे. मग कुणाला याची अडचण होत आहे? असा सवालही त्यांनी केला. फातोर्ड्यातील बिग फॅट कार्निव्हल यंदा राजकीय विरोधामुळे रद्द करण्यात आल्याचा आरोप यापुर्वीच सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

फातोर्डा येथील कार्निव्हलची 18 वर्षांची परंपरा बंद करण्याचा कट मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दामू नाईक आणि दिगंबर कामत यांनी संयुक्तरित्या रचला आहे. हा महोत्सव साजरा करण्यासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारचा फंड घेतला जात नाही.

MLA Vijay Sardesai
Yuri Alemao: फेब्रुवारी सुरू झाला... स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे नोकरभरतीचं काय झालं?

कार्निवल शो लोकांना आम्ही मोफत दाखवायचो, असे असतानाही गोयकारपणाचे प्रतीक असलेला फातोर्ड्याचा कार्निवल या त्रिकुटाने बंद पडला असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला होता.

दामू नाईक, दिगंबर कामत यांचे फातोर्डा आणि मडगावच्या विकासात कोणतेही योगदान नाही. कामत मुख्यमंत्री असताना मडगावची परिस्थिती बिकट होती. त्यांच्या कार्यकाळात ते रस्त्यावर एक साधा सिग्नल उभा करू शकले नाहीत.

गोमंतकीय लोकांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा आणि गोव्याची जनता एकत्र येऊन साजरा केला जाणारा हा महोत्सव जर सरकारी अधिकारी बंद पडत असतील तर हा एवढा खटाटोप कशासाठी अशी विचारणाही त्यांनी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com