Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Calangute Land Grabbing: मामलेदार राहुल देसाईवर आणखी एक गुन्हा दाखल

एसआयटी चौकशीनंतर यापुर्वीच झाले आहे निलंबन

Akshay Nirmale

Calangute Land Grabbing: कळंगुट जमिन हडप प्रकरणात मामलेदार राहुल देसाई याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. देसाईसोबतच पोलिसांनी सँड्रिक फर्नांडिस, अंतोनिता फर्नांडिस, मारिया अँजेला फर्नांडिस यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, तत्कालीन बार्देशचा मामलेदार राहूल देसाई हा बार्देश तालुक्यातील जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड असून त्याला सेवेतून निलंबित केले आहे. देसाई विरोधात यापूर्वीच एसआयटीने गुन्हा दाखल केला होता. बनावट दस्तावेज तयार करून जमीन हडप करण्याच्या प्रकरणात सुरू असलेल्या चौकशी दरम्यान एसआयटीने देसाईला ताब्यात घेत चौकशी सुरु केली होती. देसाईची अटक ही एका राजपत्रित अधिकाऱ्याला झालेली पहिलीच अटक होती. दक्षता खात्याकडून (Vigilance Department) आज निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले होते.

मुरगाव तालुक्यातील 2 व 3 संयुक्त मामलेदार राहुल देसाई यांच्यावर बार्देश तालुक्यातील जमीन बळकवल्याच्या आरोपाखाली विशेष तपास यंत्रणेने यापूर्वीच जबाब नोंदविण्यात आला आहे. संयुक्त मामलेदार देसाई यांच्यावर बार्देश तालुक्यातील जमिन घोटाळ्यातील 20 पेक्षा जास्त तक्रारी म्हापसा पोलिसात नोंद झाल्या आहेत. नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जमिन घोटाळ्याचे तपासकार्य पणजी येथील विशेष तपास यंत्रणेकडे सुपूर्द केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT