छत्रोत्सव Dainik Gomantak
गोवा

कुंकळ्ळीत आज वार्षिक छत्रोत्सव

देवीची पालखी भक्तांना दर्शनासाठी साडेपाच वाजेपर्यंत मूळस्थानी तळयेभाट येथे थांबणार आहे.

दैनिक गोमन्तक

कुंकळ्ळी: श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानचा वार्षिक छत्रोत्सव मंगळवारी परंपरेनुसार साजरा करण्यात येणार आहे. देवीच्या पालखी मिरवणुकीला दुपारी बारा वाजता श्री शांतादुर्गा संस्थान मंदिरातून सुरवात होणार आहे. देवीची पालखी मिरवणूक बारा छत्र्या नाचवत, धोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करीत मूळस्थानी तळयेभाट येथे पोहचणार आहे. देवीची पालखी भक्तांना दर्शनासाठी साडेपाच वाजेपर्यंत मूळस्थानी तळयेभाट येथे थांबणार आहे.

विविध ठिकाणी देवीचे भाविक देवीचे स्वागत करणार आहेत व देवीची पालखी पुन्हा परतीच्या मार्गी जाणार आहे.रात्री धुळीवंदनाने सात उत्सवाची सांगता होणार आहे. दुपारी सव्वाबारा वाजता धार्मिक विधी झाल्यावर देवीला भक्तांनी गुलाल अर्पण करून उत्सवाला सुरवात होणार आहे. बारा छत्र्या नाचवत धोल ताशाच्या गजरात देवीचा जयजयकार करीत देवीची पालखी मिरवणूक पारंपारिक गोविंद घाटी मार्गाने मल्लागिणी, जुझेंगाळ, सिद्धनगर, नायगिलो, भिवसा, व्होडी या मार्गाने मूळस्थानी तलयेभाट येथे आणण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT