Gomantak Maratha Samaj Dainik Gomantak
गोवा

गोमंतक मराठा समाजाचा वर्धापनदिन 8 रोजी

महिलांसाठी स्टॉल: बक्षीस वितरण व बाजार दिन कार्यक्रमाचे आयोजन

दैनिक गोमन्तक

पणजी: गोमंतक मराठा समाजाचा 97 वा वर्धापनदिन 8 मे रोजी राजाराम पैंगीणकर सभागृहात होणार आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून बाजारदिनाचे आयोजन करण्यात आले असून, गोव्यातील मराठा समाजातील महिलांचे स्टॉल येथे लावण्यात येणार असल्याचे गोमंतक मराठा समाजाच्या केंद्रीय महिला समितीच्या अध्यक्ष शुभदा कलंगुटकर यांनी सांगितले.

गोमंतक मराठा समाजाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत कार्यक्रम संयोजिका रंगीता वाघुर्मेकर, सचिव मीलन कामुलकर तसेच केंद्रीय महिला संयोजक उत्कर्षा बाणास्तरकर उपस्थित होत्या.

बाणास्तरकर म्हणाल्या, वर्धापनदिनानिमित्त सकाळी सत्यनारायण महापूजा होणार आहे. त्यानंतर मुलांसाठी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत महिला विविध वस्तू विक्रीसाठी स्टॉल लावणार आहेत.

बाजारदिनाचे उद्‌घाटन मडगावच्या माजी महापौर कमलिनी पैंगीणकर यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम केवळ मराठा समाजापुरताच मर्यादित नसून सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी, असे आवाहन बाणस्तरकर यांनी केले आहे.

गोमंतक मराठा समाजाच्या केंद्रीय महिला समितीची स्थापना ऑक्टोबर 2021 मध्ये झाली. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधी निवडण्यात आले. महिलांमध्ये कौशल्य आहे मात्र त्यांना व्यासपीठ मिळत नसल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यातून किमान 2 स्टॉल येथे लागणार आहेत. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यासंबंधी आम्ही विचार करत आहोत, असे शुभदा कलंगुटकर यांनी सांगितले. वाघुर्मेकर यांनीही यावेळी विचार मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT