प्रवीण आर्लेकर
प्रवीण आर्लेकरDainik Gomantak

'मोपा विमानतळ, आयुष हॉस्पिटलसाठी नोंदणी करा'

आ. आर्लेकर: युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील
Published on

पेडणे: मोपा विमानतळ व आयुष इस्पितळ या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात युवकांची आवश्यकता भासणार आहे. येथे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे युवकांनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी, असे आवाहन पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले.

वारखंड गावातील भाजप कार्यकर्ते व नागरिकांतर्फे ग्रामपंचायत सभागृहात माजी मुख्याध्यापक गोविंद मोने यांच्या हस्ते आमदार आर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी धारगळचे सरपंच भूषण नाईक उपस्थित होते. प्रवीण आर्लेकर हे नि:स्वार्थीपणे वावरणारे व्यक्तिमत्त्व असून विकासकामांसाठी सर्वांनी त्यांना सहकार्य करायला हवा, असे आवाहन धारगळचे सरपंच भूषण नाईक यांनी केले.

प्रवीण आर्लेकर
डिचोलीतील रिक्षा, मोटारसायकल पायलट रस्त्यावर

दरम्यान, अर्चीत परब या युवा चित्रकाराने आमदार प्रवीण आर्लेकर यांचे रेखाटलेले चित्र आर्लेकर यांना भेट दिले. कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच प्रभाकर परब, गौरी जोसलकर, तुकाराम केणी, गणेश परब यांनी केले.

मोपा विमानतळासाठी ज्या लोकांची जमीन गेली आहे, त्याच स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य असावे. त्यासाठी वारखंड गावातील लोकांची एक समिती निवडण्यात यावी, असे सुभाष परब म्हणाले. साईश केणी व सुंदरी परब यांनी स्वागत केले. पांडुरंग परब यांनी सूत्रसंचालन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com