Anmod Ghat Update Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat: 60 दिवस होत आले, गोवा-कर्नाटक प्रवास सुरु होणार का? 'अनमोड घाटाच्या' कामाची फाईल अडकली दिल्लीत

Goa Karnataka Road: दोन महिन्यांच्या कालावधीत कोसळलेल्या ठिकाणचे दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, अशी हमीही देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात स्थिती तशी झालेली नाही.

Sameer Panditrao

कारवार : गोवा सीमेजवळील अनमोड घाट मार्गावरील रस्ता ४ जुलै रोजी खचल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. आणखी रस्ता खचण्याचा धोका लक्षात घेऊन मडगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ५ जुलै रोजी तातडीचा आदेश काढत, अत्यावश्यक सेवा पुरविणारी वाहने व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वगळता इतर सर्व वाहनांसाठी हा मार्ग तब्बल साठ दिवस बंद ठेवला होता.

या आदेशात २ सप्टेंबरपासून म्हणजेच मंगळवारी सर्वसामान्यांसाठी घाटमार्ग पुन्हा खुला करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच दोन महिन्यांच्या कालावधीत कोसळलेल्या ठिकाणचे दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, अशी हमीही देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात स्थिती तशी झालेली नाही.

दरम्यान, संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया अजूनही कागदोपत्रीच आहे. ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली नसल्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झालेली नाही. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, या कामाची फाईल सध्या दिल्लीत मंत्रालयीन पातळीवर अडकून पडली आहे. त्यामुळे कोसळलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया रखडली आहे आणि प्रवाशांची गैरसोय कायम आहे.

अनमोड घाटमार्ग हा गोवा आणि कर्नाटक जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. रोज शेकडो वाहनांची येथे वाहतूक होते. मात्र रस्ता खचल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा आणि बसेसपुरती वाहतूक मर्यादित ठेवण्यात आली आहे. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा घाटमार्ग खुला होण्याची अपेक्षा असताना अजूनही अनिश्चितता आहे.

आता दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी रस्ता खुला करण्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे प्रवासी, व्यापारी आणि स्थानिक नागरिक यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accident: 16 दिवसांत 14 रस्ताबळी, यंदा आतापर्यंत रस्‍त्‍यांवरील अपघातात 249 ठार

Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

Horoscope:भाग्याचा तारा चमकणार! 'या' राशींना मिळणार सुखाची बातमी, वाचा तुमचे भविष्य!

Goa Crime: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! वाळपईत महिलेचं अपहरण करुन नराधमानं केलं निंदनीय कृत्य

SCROLL FOR NEXT