Goa Made Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Liquor Seized: कर्नाटकातील खाजगी बसमधून करत होता गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; बसचालक अटकेत

वाहनासहीत एकूण 14 लाख 39 हजार 600 रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे

दैनिक गोमन्तक

Goa Made Liquor Seized: गोव्यातून इतर राज्यांमध्ये गोवा बनावटीची दारूची तस्करी करण्याच्या अनेक घटना वारंवार घडत असतात. आज पहाटे 3 वाजता अनमोड अबकारी खात्याने केलेल्या तपासात अधिकाऱ्यांंना खाजगी बसमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.

कर्नाटक राज्यातून एक खाजगी बस गोव्यात आली होती आणि पुन्हा ती कर्नाटकात परतणार होती. त्यावेळी बसचालकाने बसमधून गोव्यातील दारूच्या बाटल्या घेतल्या.

अनमोड अबकारी खात्याने या बसमधून 51 लिटर दारुच्या बाटल्या जप्त केल्या असून याबाबत बसचालकाला ताब्यात घेतले आहे. चालक कृष्णा परशुराम हा मूळचा कर्नाटकातील रहिवासी आहे. यासंदर्भात वाहनासहीत एकूण 14 लाख 39 हजार 600 रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दरम्यान, पोलीस या घटनेत पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी असाच प्रकार उघडकीस आला आहे. सुप्रसिद्ध कंपनीच्या बिस्कीटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करण्यात आली होती. रामनगर येथील पोलिसांनी या ट्रकवर कारवाई करून तब्बल 2500 लीटर गोवा बनावटीची दारू जप्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT