Mandovi Accident Dainik Gomantak
गोवा

Accident Case: अंकित त्रिपाठीचा नव्याने जामीन अर्ज; उद्या सुनावणी

Accident Case: जुन्या मांडवी पुलावरील अपघाताला कारणीभूत असलेल्या रेंट ए कारचा ओडिशाचा पर्यटक चालक अंकित त्रिपाठी याने जामिनासाठी अर्ज केला आहे.

दैनिक गोमन्तक

Mandovi Accident Case Update:

जुन्या मांडवी पुलावरील अपघाताला कारणीभूत असलेल्या रेंट ए कारचा ओडिशाचा पर्यटक चालक अंकित त्रिपाठी याने जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या या अर्जावरील सुनावणी 29 फेब्रुवारीला पणजी सत्र न्यायालयाने ठेवली आहे.

अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अंकितची जबानी नोंदवून घेतली आहे तसेच रक्त तपासणीही केली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होत आला आहे तसेच त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्याने जामीन मंजूर करावा, अशी विनंती सत्र न्यायालयाकडे संशयित अंकितने केली आहे.

पोलिसांनी संशयिताला अपघातप्रकरणी त्याच दिवशी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याची मद्यचाचणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले होते. या अपघातात मांडवी नदीत बुडालेला जावेद सडेकर याचा मृतदेह सापडला नव्हता.

संशयित अंकितने जामिनासाठी अर्ज केल्यावर त्याला पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी

पोलिस कोठडी मागूनही न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्याच्या या कोठडीत आणखी दहा दिवसांनी न्यायालयाने वाढ केली आहे. त्याची रवानगी कोलवाळ येथील कारागृहात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT