Turtle conservation: मोरजीत ‘कासव संवर्धन’ यशस्वी

Turtle conservation: विश्वजीत राणे : वन खात्याअंतर्गत शॅक व्यावसायिकांच्या समस्याही सोडवणार
Morjim Turtle Conservation:
Morjim Turtle Conservation: Dainik Gomantak

Turtle Conservation In Morjim:

तेंबवाडा-मोरजी किनारी भागात यंदा दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल 115 सागरी कासवांनी साडेअकरा हजारपेक्षा जास्त अंडी घातली आहेत. वन खाते कासव संवर्धन मोहिमेंतर्गत त्यांचा योग्यरीतीने सांभाळ करत असल्यामुळे याचा कसल्याच प्रकारचा त्रास स्थानिक व्यावसायिकांना होणार नाही, अशी ग्वाही वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

तेंबवाडा-मोरजी किनारी भागात कासव संवर्धन मोहिमेच्या परिसराला मंगळवार, 27 रोजी भेट दिल्यानंतर राणे बोलत होते. मोरजी-तेंबवाडा किनारी भागात 1997 सालापासून कासव संवर्धन मोहीम स्थानिक व्यावसायिकांच्या सहकार्यातून आणि सरकारच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवली जाते.

ती याहीपुढे यशस्वी करताना शॅक व्यावसायिकांच्या पर्यटन हंगामातील ज्या प्रमुख समस्या आहेत, त्या वन खात्याअंतर्गत सोडवून त्यांनाही काही नियम आणि अटी घालून पर्यटन व्यवसाय वाढीस लावण्याबरोबरच कासव संवर्धन मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करूया.

Morjim Turtle Conservation:
Goa Politics: पाऊसकर भाजपच्या उंबरठ्यावर

यंदा जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांतच आतापर्यंत ११५ सागरी कासवांनी तब्बल साडेअकरा हजारपेक्षा जास्त अंडी या किनारी भागात घातलेली आहेत. त्याला सुरक्षा देण्याचे काम वन विभागाचे कर्मचारी २४ तास करत आहेत, असे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

तज्ज्ञांचा सल्ला घेणार! :

पत्रकारांनी विश्वजीत राणे यांना या कासवांवर ध्वनिप्रदूषणाचा परिणाम होतो का? असा सवाल केला असता आपण तज्ज्ञाशी याविषयी सल्लामसलत करणार आहे. यंदा मोठ्या प्रमाणात सागरी कासव आल्यामुळे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पावले उचलली जातील. पर्यटन व्यवसाय ज्या पद्धतीने महत्त्वाचा आहे. त्याच पद्धतीने कासव संवर्धन मोहीमदेखील यशस्वी ठरत असल्याचे विश्वजीत राणे यांनी सांगितले.

Morjim Turtle Conservation:
Dabolim Airport: सरकार दाबोळी विमानतळाचा गळा आवळतेय!

अभ्यास केंद्र उभारणार!

सरकारमार्फत कायदेशीररीत्या 2000 सालापासून तेंबवाडा किनारी भागात कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी किनारी भागात पाचशे चौरस मीटर जमीन आरक्षित केली होती आणि त्या आरक्षित जागेतच ही मोहीम राबवली जाते.

एक झोपडी उभारून हंगामी स्वरूपाचे अभ्यास केंद्र तयार केले जाते. या ठिकाणी कायमस्वरूपी अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com