Anjuna Police arrested 2 persons Dainik Gomantak
गोवा

Anjuna Crime News : अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी दोघांना शिवोलीत अटक; हणजुणे पोलिसांची कारवाई

1 लाख रुपयांचे 10 LSD पेपर्स, एक कार जप्त

गोमन्तक डिजिटल टीम

हणजूणे पोलिसांनी सुमारे एक लाख रुपयांचे अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला ताब्यात घेतले आहे. संशयित शिवोली येथील एका बीचवर कार घवून अंमली पदार्थ विक्रीसाठी आला होता. यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवोली येथील एका बीचवर कारमध्ये एक विक्रेता अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने साध्या वेशात सापळा रचला. पोलिसांनी बराच काळ वाट पाहिल्यानंतर तेथे एक कार आली असता तपासणीसाठी थांबवली.

कारची कसून तपासणी केली असता कारमध्ये पोलिसांना 1 लाख रुपयांचे 10 LSD पेपर्स अंमली पदार्थ आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी सुरज तोडी (29) रा. शिवोली मूळ. बंगलोर या संशयिताला अटक करण्यात आली.

अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली आहे अशी माहिती एसडीओपी म्हापसा यांनी दिली.

संशयिताची चौकशी केली असता कालिदास नाईक (50) रा. हणजुणे या संशयिताला एलएसडी पेपर्सची विक्री केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत सायंकाळी संशयिताला अटक केली. चौकशीत संशयित सुरज याने अनेक नावे उघड केली आहेत.

संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता कालिदास नाईक याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच सूरज तोडी याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर मोहीम उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, डीवायएसपी जिवबा दळवी, एसडीओपी म्हापसा यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय प्रशाल देसाई, पीआय हणजुणे पीएस, पीएसआय साहिल वारंग आणि कॉन्स्टेबल महेंद्र मांद्रेकर, रूपेश आजगावकर,अविर कळंगुटकर आणि हणजुण पोलिस स्थानकाचे अभिषेक कासकर, अनिकेत पेडणेकर यांच्या टीमने पार पाडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT