Miramar Hit And Run Case : मिरामार येथे राडा; पर्यटकाला कारमध्ये घुसून मारहाण

गोवा पोलिसांत तक्रार दाखल
Hit & Run Case At Miramar
Hit & Run Case At MiramarDainik Gomantak

Miramar Hit And Run Case : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांबाबत अनेक किस्से घडत असतात. इथे येणाऱ्या पर्यटकांसोबत अनेकदा कोणत्या तरी गोष्टीवरून वाद होऊन प्रकरण अगदी हाणामारीपर्यंत पोहोचते. अशीच एक घटना आज पणजीतील मिरामार येथे घडली आहे.

Hit & Run Case At Miramar
Nitishkumar on Goa CM: नितीशकुमार यांचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर ताशेरे; दिला 'हा' सल्ला...

मिरामार येथे हिट अ‍ॅन्ड रन प्रकरण समोर आले आहे. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांध्ये व्हायरल झाला असून याबाबत गोवा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार दोन वाहनचालाकांमध्ये घडला.

दिल्ली कारचा ड्रायव्हर हा समोरील कारला धडक देवून पळून जात होता असे समजते. धडक दिलेल्या कारचा ड्रायव्हर दिल्लीच्या कार ड्रायव्हरला कारमध्ये घुसून मारहाण आणि शाब्दिक शिवीगाळ करताना दिसते. याप्रकारामुळे बराच काळ तेथे वाहतूक कोंडी झाली होती. हा प्रकार तेथे बराच काळ सुरु होता. तसेच एक महिला दिल्लीच्या कारचा आरश्याची नासधूस करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. या पूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांध्ये व्हायरल झाला आहे.

या प्रकरणाची दखल घेत गोवा पोलिसांनी तक्रार दाखल केली असून कारवाई केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com