Calangute Drugs Seized: कळंगुटमध्ये 2.5 लाखांचे अमली पदार्थ जप्त; परप्रांतीय युवकास अटक

कळंगुट पोलिसांची कारवाई
Calangute Drugs Seized:
Calangute Drugs Seized: Dainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Crime: कळंगुट पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीप्रकरणी केलेल्या कारवाईत एका परप्रांतीय युवकास अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 2.5 लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंगुट येथील बोडकेव, पोरबावडो येथे बुधवारी दुपारी सव्वा दोन ते सव्वा चार या वेळेत तपासणी केली जात होती. पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत, पर्वरीचे एसडीपीओ विश्वेश कर्पे यांच्या देखरेखीखाली हा छापा टाकण्यात आला.

Calangute Drugs Seized:
Nitishkumar on Goa CM: नितीशकुमार यांचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर ताशेरे; दिला 'हा' सल्ला...

यावेळी एका तपकिरी रंगाच्या शोल्डर बॅगची तपासणी करण्यात आली. या बॅगमध्ये हेरॉईन हे ड्रग्ज असल्याचा संशय पोलिसांना होता. झडती घेतल्यानंतर या बॅगेमध्ये तपकिरी रंगाची पावडर आढळून आली आहे.

या पावडरचे एकूण वजन 21 ग्रॅम इतके असून त्याची बाजारातील किंमत 2 लाख 10 हजार रूपये असल्याचा अंदाज आहे. तर केशरी रंगाची पावडर देखील आढळून आली. ही पावडर MDMA हा पदार्थ असल्याचा संशय आहे. ही केशरी पावडर सुमारे 4 ग्रॅम इतकी होती. त्याची अंदाजे किंमत 40 हजार रूपये इतकी आहे. अशाप्रकारे एकूण 2 लाख 50 हजार रूपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

कळंगुट पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रमेश हरिजन यांनी या प्रकरणी एनडीपीएस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी मतिऊर रेहमान याला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा अशोक ग्राम, बिष्णुपूर, दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल येथील आहे. गेल्या काही काळापासून तो गोव्यातच वास्तव्यास असल्याचे समजते. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com