Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : वेश्या व्यवसायात गुंतलेल्या दोन दलालांना गोवा पोलिसांकडून बेड्या

हणजुण पोलिसांनी धडक कारवाई करत तीन तरुणींची सुटकाही केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : मानव तस्करी तसेच वेश्याव्यवसाय प्रकरणात गुंतलेल्या दोघांना मायनाभाटी-हडफडे येथून अटक करण्यात आली आहे. हणजुण पोलिसांनी धडक कारवाई करत तीन तरुणींची सुटकाही केली आहे. पर्यटन हंगाम तोंडावर आलेला असतानाच मायनाभाटी-हडफडे येथे वेश्याव्यवसाय प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना गजाआड केलं आहे.

एका तरुणीला ग्राहकाला पुरवण्यासाठी आलेल्या संशयित मोहसीन शेख (गुजरात) तसेच शिल्पी मिश्रा (मुंबई) यांच्या हणजुण पोलिसांकडून शिताफीने मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी वेश्या व्यवसायासाठी गोव्यात आणलेल्या आणि नामांकित रिसॉर्टमध्ये दडून बसलेल्या अन्य दोघा तरुणींचीही पोलिसांनी नंतर सुटका केली.

हणजूण पोलिसांकडून संशयित मोहसीन शेख तसेच शिल्पी मिश्रा यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या 378/370(3) तसेच आरडब्ल्यु 34 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच मनुष्य तस्करी प्रकरणात कलम 3आणि 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना तसेच म्हापसा उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हणजुणचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT