Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: ड्रग्ज पेडलर्सचे धाबे दणाणले! आसगावातून 59 वर्षांच्या ग्रीक नागरिकाला अटक; 23.81 लाखांचा मुद्देमाल जप्त

Drug Case: पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या गोव्यातील उत्तर गोवा किनारपट्टी भागात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे.

Sameer Amunekar

पणजी: पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या गोव्यातील उत्तर गोवा किनारपट्टी भागात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. हणजूण पोलिसांनी गुरुवारी असगाव येथे एका गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून ५९ वर्षीय ग्रीक नागरिकाला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

२३ लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त

अंजुना पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक (PI) सूरज गावस आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, आसगाव येथील एका विशिष्ट ठिकाणी अमली पदार्थांचा साठा असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत संशयित विदेशी नागरिकाकडून २.२७१ किलो 'चरस' आणि १०.७७ ग्रॅम 'एक्स्टसी' (Ecstasy) जप्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या जप्त केलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत सुमारे २३.८१ लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

अटक करण्यात आलेल्या ग्रीक नागरिकावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (NDPS Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीयरीत्या पार पाडण्यात आली.

गोव्यातील ड्रग्ज रॅकेटमध्ये विदेशी नागरिकांचा किती मोठा सहभाग आहे, हे या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास अधिक तीव्र केला असून, हा साठा कोणाकडून आणला होता आणि तो कोणाला विकला जाणार होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

१० दिवसांची पोलीस कोठडी

संशयित आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलीस त्याच्याकडे असलेल्या व्हिसा आणि पासपोर्टची पडताळणी करणार असून, तो गोव्यात किती काळापासून अशा कृत्यांमध्ये सामील आहे, याची सखोल चौकशी केली जाणार आहे. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात अमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT