FIR Dainik Gomantak
गोवा

Thalassa By Cliff Restaurant: 'थलासा बाय क्लिफ' रेस्टॉरंटविरुद्ध हणजूणे पोलिसांची कारवाई; ध्वनी प्रदूषणाचे नियम बसवले धाब्यावर!

Anjuna Police: ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हणजूणे पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

Manish Jadhav

गोव्यात वाढत्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यातच उत्तर गोव्यातील हणजूणे बीच परिसरात सातत्याने रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरु असतात. या पार्ट्यांमध्ये मोठ्या आवाजात संगीत लावलेले असते. त्याचा त्रास परिसरातील, गावातील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी वारंवार झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हणजूणे पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ओझरान, वागातोर येथील 'थलासा बाय क्लिफ' या रेस्टॉरंटविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी ओझरान, वागातोर येथील 'थलासा बाय क्लिफ' या रेस्टॉरंटविरुद्ध ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हणजूणे पोलिसांनी (Anjuna Police) गुन्हा नोंदवला. ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2000 चे कलम 5 आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 15 अन्वये ही कारवाई करण्यात आली. सिलरॉय मास्केल या व्यक्तीच्या मालकीचे हे 'थलासा बाय क्लिफ' रेस्टारंट आहे. 15 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा या रेस्टारंटमध्ये मोठ्या आवाजात संगीत लावण्यात आले होते. तपासादरम्यान डिस्प्ले बोर्डसह पायोनियर डीजे मिक्सर आणि मेक डायनाटेकचे स्पीकर पोलिसांनी जप्त केले. पुढील तपास सुरु आहे.

'ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा'

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी आमदार दिलायला लोबो (Delilah Lobo) यांच्यासह हणजूणे, वागतोर आणि शापोरा येथील रहिवाशांनी ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टारंट्स आणि नाईट क्लब्सच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यावेळी त्यांनी त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांकडूनही कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT