Sunburn Festival Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

'थर्टीफर्स्टला सनबर्न नको' हणजूण परिसरातील स्थानिकांची मागणी, लोबो CM ना करणार विनंती

हणजूण परिसरातील स्थानिकांनी थर्टीफर्स्टला घेऊ नये अशी मागणी केली आहे.

Pramod Yadav

Sunburn Goa 2023: गोव्यात दरवर्षी सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते, दरम्यान, थर्टीफर्स्टला याचे आयोजन केले जाऊ नये अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

हणजूण परिसरातील स्थानिकांनी थर्टीफर्स्टला घेऊ नये अशी मागणी केली आहे.

गोव्यात डिसेंबरचे शेवटचे तीन दिवस सनबर्न संगीत महोत्सवाचे ठरलेले असतात. सहा महिन्यापूर्वी पासूनच यासाठी तिकिट बुकिंग केले जाते. दरम्यान, यावेळी थर्टीफर्स्टला सनबर्न घेऊ नये, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

सनबर्न तीन दिवस व्हावा पण तो थर्टीफर्स्टला घेतला जाऊ नये, मुख्यमंत्र्यांना विनंती करुन महोत्सवाच्या तारखा बदलण्याची विनंती करणार असल्याचे आमदार दिलायला लोबो यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी 31 डिसेंबर रोजी ईडीएम सनबर्न रात्री आठ वाजता बंद करावा अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली होती.

आठ वाजता सनबर्न बंद केल्यास शॅक आणि हॉटेल मालकांना ग्राहक मिळतील. तसेच, हणजूण किंवा वागाोतर परिसरातच सनबर्न व्हावा कारण या भागात मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहे. थोडा त्रास होईल मात्र, स्थानिकांना उत्पन्न मिळेल, असे आमदार लोबो म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT