RGP leader Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

डेनियलने 'हणजूण बीच'चा गळा घोटलाय, शिवोलीच्या आमदार गप्प का? लोबोंच्या मुलावर आरोप; RGPची Post Viral

Anjuna Beach Controversy: मंत्री मायकल लोबो आणि शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांचा मुलगा आणि पर्राचे सरपंच डेनियल लोबो हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे

Akshata Chhatre

हणजूण: कळंगुटचे आमदार आणि मंत्री मायकल लोबो आणि शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांचा मुलगा आणि पर्राचे सरपंच डेनियल लोबो हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर हणजूण येथील समुद्रकिनाऱ्याचे आणि पर्यावरणाचे नैसर्गिक स्वरूप नष्ट करून खासगी मालमत्ता विकसित करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप रेव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीचे (RGP) अध्यक्ष मनोज परब आणि हणजूण येथील काही ग्रामस्थांनी एकत्र येत केला आहे, ज्यामुळे किनारी भागातील विकासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मनोज परबांची पोस्ट व्हायरल

मनोज परब यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. काही स्थानिकांनी देखील एकत्र येत डेनियल लोबो यांनी अनिल पिंटो नावाच्या व्यक्तीकडून ही जागा विकत घेतली असून, तेथे खासगी मालमत्ता विकासाचे काम सुरू असल्याचा दावा केला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, किनाऱ्याच्या बाजूला 'सी-वॉल'च्या नावाखाली एखादा कॅफे, क्लब किंवा तत्सम व्यावसायिक प्रकल्प विकसित केला जात आहे. हे काम पर्यावरण आणि किनारी नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

स्थानिक आमदार म्हणून त्यांनी यात लक्ष घातले पाहिजे

या प्रकरणात बेकायदेशीर कामाचा स्पष्ट संशय व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून या कामाला विरोध करून आवाज उठवताच, या ठिकाणी कार्यरत असलेले कामगार काम अर्धवट सोडून पळून गेले. या घटनेमुळे हे काम बेकायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचा त्यांचा संशय बळावला आहे.

हणजूण वासियांनी शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांना प्रकरण गांभीर्याने हाताळण्याची विनंती केली आहे. "स्थानिक आमदार म्हणून त्यांनी यात लक्ष घातले पाहिजे," असे ते म्हणाले. यासोबतच, "हा डेनियल लोबो कोण?" याची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारण या सगळ्या बेकायदेशीर कामांमध्ये त्याचंच नाव समोर येत आहे, अशी मागणी त्यांनी केली असून हा आरोप गोव्यातील राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठा मुद्दा बनण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

बांगलादेशात क्रूरतेचा कळस! 50 वर्षीय हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करुन दिलं पेटवून; 31 डिसेंबरची रात्र ठरली 'काळरात्र'

SCROLL FOR NEXT