Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Anjuna Assault: धारदार शस्त्राने डोक्यावर केला वार, 1 महिन्यानंतर पीडित व्हेंटिलेटरवरच; संशयिताचा जामीन फेटाळला

Anjuna Crime: हणजूण येथे १६ सप्टेबर रोजी झालेल्या मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या साहिल बापू याचा जामीन अर्ज मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हणजूण येथे १६ सप्टेबर रोजी झालेल्या मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या साहिल बापू याचा जामीन अर्ज मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. पीडिताचा जबाब अद्याप नोंदविता आलेला नाही.

आणि या टप्प्यावर संशयिताला जामीन देणे योग्य ठरणार नसल्याच्या सरकारी पक्षाचा युक्तीवादाला न्यायालयाने ग्राह्य धरत हा जामीन अर्ज फेटाळला. या हल्ल्यातील पीडित व्यक्ती ही ‘व्हेंटिलेटर’ वर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

पोलिसांच्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी सकाळी शापोरा येथील ‘अवतारा बार अँड रेस्टॉरंट’ जवळ साहिल बापू याने साईराम या व्यक्तीवर धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली होती.

या प्रकरणावर दिलेल्या आदेशात अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरती कुमारी नाईक यांनी गुन्ह्याचे गांभीर्य आणि पीडिताची गंभीर आरोग्यस्थिती ही जामीन नाकारण्याची मुख्य कारणे असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने नमूद केले की, पीडित अद्याप शुद्धीवर आलेला नाही आणि गेल्या महिन्याभरापासून हैदराबाद येथील रुग्णालयात ‘व्हेंटिलेटर’वर आहे.

तपास अधिकाऱ्याने न्यायालयासमोर सांगितले की, आरोपी साहिल बापू याची ओळख आणि अटक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे करण्यात आली. तसेच पोलिसांनी आरोपीकडून हल्ल्यात वापरलेले शस्त्र आणि त्यावेळी परिधान केलेले कपडे जप्त केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket: निवृत्तीच्या वयात पदार्पण! 38 वर्षीय आफ्रिदीची कसोटी क्रिकेटमध्ये एन्ट्री

'पुलिसांक काय Value ना?", नरकासुर मिरवणुकीत आवाज वाढवला, मंडळाने घातली हुज्जत; पोलिसांनी घेतली कडक ऍक्शन

Narkasur in Goa: नरकासुर स्पर्धेत राडा! काणकोणात मिरवणुकीच्या रस्त्यावरून दोन गट भिडले; जोरदार हाणामारी

Viral Video: 'देसी' आयडिया जिंदाबाद! सुरी मिळाली नाही म्हणून पठ्ठ्यानं कात्रीनं कापलं सफरचंद, व्हिडिओ पाहून म्हणाल 'व्वा!'

Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

SCROLL FOR NEXT