Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: निंबाळकरांची 'ती' पोस्ट काही तासांत डिलीट; सरदेसाईंवरील टीकेनंतर राजकीय चर्चेला उधाण, 'गोवा फर्स्ट'वर निशाणा

Anjali Nimbalkar Vijay Sardesai Post: गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यावर टीका करणारी ‘एक्स’ या सोशल प्लॅटफॉर्मवरील पोस्ट काँग्रेसच्या सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी काही तासांनंतर हटवली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यावर टीका करणारी ‘एक्स’ या सोशल प्लॅटफॉर्मवरील पोस्ट काँग्रेसच्या सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी काही तासांनंतर हटवली. त्यामुळे ही पोस्ट हटवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून आदेश आला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

डॉ. निंबाळकर यांनी सकाळी पोस्ट करून त्याद्वारे गोवा फॉरवर्ड पार्टी आणि आम आदमी पक्ष गोमंतकीयांच्या हितासाठी काम करत नाहीत. ते पक्ष भाजपच्या ‘बी’ टीम म्हणून केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कार्यरत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याशिवाय त्यांनी आमदार विजय सरदेसाई यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती.

डॉ. निंबाळकर यांनी समाजमाध्यमाद्वारे केलेल्या निवेदनात वरील दोन्ही पक्षांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यांनी गोवा फॉरवर्डच्या भूमिकेवर काँग्रेसतर्फे आक्रमक आणि कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले होते. आमदार सरदेसाई हे सध्या राजकीयदृष्ट्या घाबरलेले दिसत आहेत आणि त्यांच्याकडे स्पष्टीकरणासाठी शब्द उरलेले नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते. तसेच २०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत राहण्याची काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत हातमिळवणी करणारे सरदेसाई हेच होते, याची आठवण त्यांनी करून दिली होती.

चोडणकरांच्या भूमिकेचे समर्थन

डॉ. निंबाळकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या भूमिकेचे समर्थन केले. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कोणत्याही तडजोडीशिवाय प्रत्येक जागा जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार आहे. भाजप आणि त्यांना पडद्यामागून मदत करणाऱ्या ‘बी’ टीम्सचा पराभव करण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने सामना करेल, असे म्हटले होते. परंतु आता पोस्ट हटवण्यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT