Goa Theft Case: कुंकळ्ळीत बंद घर फोडून 18.80 लाखांचा ऐवज लंपास; भर लोकवस्तीत चोरी, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Kunkalli Theft Case: देमानी - कुंकळ्ळी येथील बंद घर हेरून चोरट्यांनी चोरी करून आतील सोन्याचे दागिने तसेच अन्य मौल्यवान वस्तू मिळून एकूण अठरा लाख ऐंशी हजारांचा ऐवज पळविला.
Kunkalli Theft Case
Goa Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: देमानी - कुंकळ्ळी येथील बंद घर हेरून चोरट्यांनी चोरी करून आतील सोन्याचे दागिने तसेच अन्य मौल्यवान वस्तू मिळून एकूण अठरा लाख ऐंशी हजारांचा ऐवज पळविला.

भर लोकवस्तीत ही घटना घडल्याने रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

Kunkalli Theft Case
Goa Weather: घाटमाथा चिंब भिजला, पणजीसह किनारपट्टी कोरडीच; गोव्यात पावसाची तूट 31.6 टक्क्यांवर, शेती-बागायतींची चिंता वाढली

फिरदोज बेगम या तक्रारदार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मंगळवारी (ता. १५) घर बंद करून मडगाव येथे गेल्या होत्या. चोरट्यांनी ही संधी साधून घराच्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला आणि आतील सोन्याचे दागिने व अन्य वस्तू पळविल्या.

चोरीच्या घटनेची माहिती मिळताच कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या भागातील सीसीटीव्ही केमॅऱ्यांच्या आधारे पोलिस चोरट्यांचा माग काढत आहेत. उपनिरीक्षक किशोर वेळीप पुढील तपास करीत आहेत.

Kunkalli Theft Case
Goa Medical College: गोमेकॉत रुग्णांच्या जेवणात मोठा बदल; स्टील प्लेटऐवजी आता 'कॅम्ब्रो प्लेट', स्वच्छता आणि पोषणावर विशेष भर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com