Anganwadi workers  Dainik Gomanta
गोवा

अंगणवाडी सेविकांचे आमरण उपोषण संपले

मंत्री विश्वजित राणे यांनी अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडवल्याचे केले स्पष्ट

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांना सेवेत घेण्यासाठी गेले चाळीस हून अधिक सुरु असलेले उपोषण आता थांबले आहे. कारण गोवा सरकारने याबाबत स्पष्टता दिली असून या सेविकांना सेवेत घेतले जाणार असल्याचे म्हटले आहे. सेविकांनी याबाबत स्पष्ट करताना म्हटले आहे की, गोवा सरकारने याबाबत आम्हांला सेवेत घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामूळे हे उपोषण आम्ही मागे घेत आहोत.

सद्या सुरु असलेल्या राज्याच्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न चांगलाच गाजला होता. यावरुन गोवा सरकारने गेले चाळीस दिवस सूरु असलेल्या उपोषणावरुन चांगलेच धुमशान उडाले होते. यामूळे गोवा सरकारने हा प्रश्न तातडीने निकाली काढला असून याबाबत मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविकांचे जे प्रश्न होते ते शासनाने सोडवले आहेत. त्यामूळे बरेच दिवस सूरु असलेले उपोषण अंगणवाडी सेविकांनी मागे घेतले आहे.

अंगणवाडी सेविकांनी आज रात्री 8.50 वाजता याबाबत माहीती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, ज्या समस्यांकरता आम्ही हे उपोषण केले होते. त्या मागण्या गोवा सरकारने मान्य केल्या आहेत. तसेच आम्हाला सेवेत घेतले जाणार असल्याची शाश्वती ही दिली आहे. त्यामूळे हे उपोषण आम्ही संपवत आहोत.

गोवा विधानसभेत सुरु असलेल्या अधिवेशनात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते तसेच गोवा विधान सभा सदस्य विजय सरदेसाई यांनी हा मुद्दा लावून धरल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला व हा प्रश्न निकाली काढला. त्यामूळे अंगणवाडी सेविकांचा जीव भांड्यात पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Scheme: 'स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार' योजने अंतर्गत तपासणी करून घ्‍या, CM सावंतांचे महिलांना आवाहन

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, सुपर-4 मधील 'हाय होल्टेज' सामना 'या' दिवशी रंगणार; जाणून घ्या वेळापत्रक

Rohan Desai: रोहन देसाई यांचे भवितव्य शुक्रवारी ठरणार, बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यांच्या छाननी प्रक्रियेकडे लक्ष

Goa Weather Update: राज्यात मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

"दक्षिण गोव्‍यात येण्‍याची चूक करू नका..." टॅक्‍सीवाल्‍यांनी केली दमदाटी, अहमदाबाद येथील महिलेनं व्‍हिडिओद्वारे व्‍हायरल केली व्यथा Watch Video

SCROLL FOR NEXT