Goa Political Crisis: गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत भाजपवर निशाणा साधला. भाजपला देशभरातील विरोधकांना संपवायचे असल्याचे पाटकर यांनी म्हटले. ते म्हणाले की, 'गोव्यातही काँग्रेसचे 8 आमदार फोडण्याचा त्यांचा प्लॅन होता, परंतु तो फसला.' पाटकर पुढे म्हणाले की, 'या निवडणुकीत 67 टक्के लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले आहे.'
अमित पाटकर (Amit Patkar) म्हणाले, ''काँग्रेसच्या विचारधारेशी संबंधित असलेले आमदार कुठेही जात नाहीत. त्यांचा काँग्रेसच्या (Congress) विचारसरणीवर विश्वास आहे. सात आमदारांशी बोलणे झाले आहे.. आणि मला खात्री आहे की संध्याकाळपर्यंत एक आमदारही येईल.''
दरम्यान, भाजप (BJP) सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत गोवा काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, आम्ही कायदा डोळ्यासमोर ठेवून काम करत आहोत. पक्षांतरविरोधी कायद्याच्या मुद्द्यावर पाटकर म्हणाले, "यात कुठेतरी बदल व्हायला हवा. भाजप प्रत्येक वेळी हेच करते.. कर्नाटकात बघा. मध्य प्रदेशात पाहा.. 2017 मध्ये भाजपने गोव्यात मध्यरात्री ऑपरेशन केले. "त्यात...काँग्रेसचे दहा आमदार विकत घेतले...पक्षपाती...म्हणून कुठेतरी थांबायला हवे."
तसेच, आमदारांना अन्यत्र नेण्यासाठी भाजपकडून चार्टर्ड विमानाचीही व्यवस्था करण्यात आल्याचा आरोप अमित पाटकर यांनी केला. ते पुढे म्हणाले, "लोक तुम्हाला विश्वासात घेऊन मतदान करतात... लोकांच्या विश्वासाला तडा जाणे योग्य नाही. हे थांबले पाहिजे..मला आनंद आहे की, काल आम्ही भाजपचे षड्यंत्र यशस्वी होऊ न देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.