आज किंवा उद्या विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होईल; अमित पाटकर

काँग्रेस पक्षात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Amit Patkar
Amit Patkar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आज एआयसीसीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) बैठकीत विरोधी पक्षनेत्याचा निर्णय घेतला जाईल आणि त्याबाबतची घोषणा आज किंवा उद्या केली जाईल, असे GPCC अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

(Leader of opposition will be announced by today or tomorrow Patkar)

Amit Patkar
संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर आज तोडगा काढणार; CM सावंत

दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्या विरोधात काँग्रेसने पक्षविरोधी कारवायांसाठी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेची स्पीकर कार्यालयाकडून छाननी सुरू असून, त्यांनी आम्हाला उद्या सकाळी 10 वाजता बोलावले आहे, अशी माहिती पाटकर यांनी दिली. “आम्ही या प्रकरणावर युक्तिवाद करू.

प्रथमच आम्ही एक आदर्श ठेवला आहे आणि कठोर कारवाई केली आहे,” असे पाटकर म्हणाले. काँग्रेस पक्षात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. “भाजपमध्ये दोन गट आहेत आणि ते एकमेकांवर खुश नाहीत. याशिवाय सीएमशिपसाठीही लढत आहे. तीन वर्षांपूर्वी 10 जुलै रोजी भाजपने काँग्रेसच्या आमदारांना पक्षातून बाहेर काढले होते. यावेळी त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले,” पाटकर यांनी निदर्शनास आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com