Anganwadi Workers Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळत नाहीत, अंगणवाडी सेविका आक्रमक

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची अमलबजावणी झाली नसल्याचा आरोप केला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तीन मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, या मागण्याची अमलबजावणी झाली नसल्याचे सांगत 62 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच निवृत्तीचा आदेश आल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. पणजीतील आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप सरकारने दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. (Anganwadi Workers News Updates)

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्या, यासाठी आझाद मैदानात 23 ते 29 डिसेंबर 2021 या काळात आंदोलन केले होते. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न सोडविण्यास मुख्यमंत्री तयार नव्हते, त्यावेळी आंदोलन (Protest) मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर नेण्यात आले, मुख्यमंत्र्यांनी तीन मागण्या मान्य करण्यास त्यावेळी मंजुरी दिली होती. मात्र डिसेंबरमध्ये केलेल्या मागण्यांची अमलबजावणी मुख्यमंत्र्यांकडून केली गेली नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिलेला शब्द पाळत नाहीत, अशी टीका अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी (CM) ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर 3 लाख मिळतात, त्यांना 5 लाख आणि दीड लाख मिळतात असलेल्यांना 3 लाख देण्याचे मान्य केले होते, त्यासोबतच सर्व कर्मचाऱ्यांना सरासरी 1500 रुपयांची वाढ देण्याचे आश्‍वासनही दिले होते. इतकंच नाही तर निवृत्तीचे वय 60 वरुन 62 करण्याचेही मान्य केले होते. मात्र, काही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 60 वर्षातच निवृत्तीचा आदेश आलेला आहे. निवृत्तीचा आदेश आलेल्या कर्मचाऱ्यांना 3 लाख रुपये मिळणार आहेत की नाही याबाबत देखील साशंकता आहे, असं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

पत्रकारांशी बोलताना अंगणवाडी कर्मचारी सुलभा साखळकर म्हणाल्या, मला 60 वर्षात निवृत्तीचा आदेश आला आहे. सरकारने (Government) नोव्हेंबर मध्ये निवृत्तीचे वय 62 करणार असल्याचे सांगितले होते. मात्र तसे काही झालेले नाही. त्यासोबतच मला निवृत्ती नंतर 3 लाख रुपये मिळणार आहेत की नाही याबाबत देखील संभ्रम आहे, असेही त्या म्हणाल्या. तसेच सरकार सर्वांना पेन्शन देते. आम्ही 30-40 वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून काम बजावतो आणि त्यानंतर आम्हाला आमची उपजिविका भागविण्यासाठी पेन्शन मिळत नाही, मग आमच्या कुटुंबियांनी जगावे कसे, आमच्या गरजा आम्ही कशा भागवाव्या असा सवाल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT