Anganwadi Worker Protest Dainik Gomantak
गोवा

तब्येत खालावल्याने आंदोलक अंगणवाडी सेविकेला रुग्णालयात हलवलं

डॉक्टरांकडून तपासणी; पणजीतील आझाद मैदानावर रुग्णवाहिका दाखल

आदित्य जोशी

पणजी : चाळीस दिवसांपासून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या अंगणवाडी सेविकांची तब्येत आणखी खालावली आहे. डॉक्टरांकडून सातत्याने या आंदोलकांची तपासणी केली जात असून खबरदारीचा उपाय म्हणून पणजीतील आझाद मैदानावर 108 रुग्णवाहिकाही दाखल झाली आहे. डॉक्टरांनी आंदोलक महिलांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यात रक्तदाब कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एका अंगणवाडी सेविकेला रुग्णालयाद नेण्यात आलं आहे.

सेवेत पुन्हा रुजू करून घेण्याच्या आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी गेल्या चाळीस दिवसांपासून आझाद मैदानावर बसलेल्या अंगणवाडी सेविकांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती खालावली तरीही उपचारासाठी आरोग्य केंद्रात जाण्यास या सेविकांनी नकार दिला आहे. मात्र त्यातील एका आंदोलक सेविकेची प्रकृती शनिवारी सकाळी आणखीन खालावली. त्यामुळे तिला जबरदस्तीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

अंगणवाडी सेविकांच्या पणजीतील आझाद मैदानात सुरु असलेल्या उपोषणाचा आज शनिवारी 45 वा दिवस आहे. मागील काही दिवसांमध्ये आंदोलक महिलांची तब्येत बिघडली होती, त्यांच्यावर उपचारही झाले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हमीपत्रात घातलेल्या त्यांनी मान्य करण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर आझाद मैदानावरून न हटण्याचा निर्धारही या अंगणवाडी सेविकांनी केला आहे. या सेविकांनी पाण्याचाही त्याग केला असून आता त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

झटपट पैशांचा मोह आवरेना! स्‍थानिकांचा कल ड्रग्‍स व्‍यवसायाकडे; सरकारची विधानसभेत माहिती

Team India New Coach: गोव्याचा सुपुत्र आता टीम इंडियाचा 'बॉस'! महेश गवळी यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

महासत्ता अमेरिकेवर 39 ट्रिलियन डॉलरचे कर्ज; करकपात, युद्धांवरील खर्चामुळे बोजा वाढला

IFL 2026: धेंपो क्लबला पहिल्या विजयाची प्रतीक्षा, तीन लढतीतून दोन गुण; गोकुळम केरळाविरुद्ध आज सामना

Dhurandhar 2 Collection: बॉक्स ऑफिसवर 'हमजा अली'चा धुमाकूळ! पहिल्याच दिवशी तोडला मोठा विक्रम; कलेक्शन 100 कोटी पार

SCROLL FOR NEXT