पावसामुळे कोंब मडगाव येथील अंडरपास पाण्याखाली

अंडरपासमध्ये पाणी साचल्याने रेल्वे फाटक पडल्यावर वाहतुकीची कोंडी
Underpass at Komb Madgaon in water
Underpass at Komb Madgaon in water Dainik Gomantak

मडगाव : मुसळधार पावसामुळे अजूनही मडगाव परिसरात ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे. कोंब मडगाव येथील अंडरपास पाण्याखाली गेल्याने मडगावकरांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. रेल्वे मार्गाखालून जाण्यासाठी बांधलेल्या अंडरपासमध्ये पाणी साचल्याने रेल्वे फाटक पडल्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे.

दुसरीकडे गुडी पारोडा येथील पुलाचा कठडाही पावसामुळे वाहून गेल्याचं आता समोर आलं आहे. केपे येथील कुशावती नदीला पूर आल्याने पारोडा येथे पुलावरून पाणी वाहू लागल्याने रस्ता आणि नदीचे पाणी समान पातळीवर आले होते. या पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे नदीच्या काठावर असलेल्या पारोडा आणि अवेडे या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. अजूनही पाण्याची पातळी खालावलेली नसली तरीही पावसाने काहीशी उसंत घेतल्यामुळे पुराचा धोका कमी झाला आहे.

Underpass at Komb Madgaon in water
कुयणामळ सांगेत घरात झिरपू लागले पाणी

उत्तर गोव्यातही गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस शुक्रवारी दिवसभर सुरू राहिल्याने बार्देश तालुक्यातील अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, गिरी पंचायत कार्यालयाला पावसाच्या पाण्याने वेढा घातला होता. शिवाय तिथे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. अजूनही गिरीसह अनेक भागातील शेती पाण्याखाली असली तरी पाऊस थांबल्यामुळे पाणी हळूहळू ओसरत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com