Kelbai Devi Puratan Idol Dainik Gomantak
गोवा

Kelbai Goddess Statue: अद्भुत! पर्येतील वाळवंटी नदीत आढळली 'केळबाय देवी'ची कदंब राजवटीतील पुरातन मूर्ती

Kelbai Goddess Statue: तुळशीमळा, पर्ये व पोडोशे या गावामधून वाहणाऱ्या वाळवंटी नदीपात्रातील काळात्री कोंड येथे जवळपास दहाव्या शतकातील कदंब राजवटीतील केळबाय देवीची मूर्ती सापडली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: तुळशीमळा, पर्ये व पोडोशे या गावामधून वाहणाऱ्या वाळवंटी नदीपात्रातील काळात्री कोंड येथे जवळपास दहाव्या शतकातील कदंब राजवटीतील केळबाय देवीची मूर्ती सापडली आहे.

ही मूर्ती वेदांत केरकर यांना दिसली, त्यांनी त्याची माहिती पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर दिली. त्यानंतर पुरातत्त्व शास्त्र विषयाचे विद्यार्थी विठोबा गावडे व अॅड. सुरज मळीक यांनी पाण्यातून मूर्ती बाहेर काढली. ही मूर्ती सुंदर असून गोव्यातील महत्त्वपूर्ण मूर्ती म्हणून पुरातत्त्व विभागाने निकष काढला आहे. मूर्ती प्रेक्षणीय असून किरीट मुकट, कर्ण भुषण व अन्य अलंकाराने नटलेली आहे. तसेच ही मूर्ती साडी नेसलेली आहे.

याबाबत पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी सांगितले की, ही केळबायची गजलक्ष्मी स्वरूप मूर्ती असून ती समृद्धीची देवता गणली जाते. कदंब राजवटीतीतील अनेक पैलूंचे दर्शन यातून स्पष्ट दिसते.

त्यामुळे पुरातत्त्व विभागाला व मूर्ती अभ्यासकांना या मूर्तीच्या शोधाने एक नवीन दालन उपलब्ध झाले आहे. कदंब राजवटीमधील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा इतिहासाच्या पैलूंचे दर्शन घडते. सोंडेत कलश धारण केलेले असून या चतुर्हस्त मूर्तीच्या वरच्या दोन हातात कमळाचे कळी, खालचे दोन हात अभय व वरद मुद्रेत आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दोन हत्ती, सोंडेत कलश धारण केलेले आहेत.

मूर्तीच्या ललाट बिंबांवर कीर्ती मुख असून मूर्ती पद्मासन आसनात आरूढ आहे, असे त्यांनी सांगितले. ही मूर्ती राज्य पुराण वस्तू संग्रहालयाचे संचालक डॉ वासू उसपकर व अधिकारी मनीषा गोवेकर यांना सुपुर्द करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT