Ancient coins In Goa Dainik Gomantak
गोवा

Ancient coins In Goa: ‘ती’ नाणी ‘पुरातत्व’कडे सुपूर्द

Ancient coins In Goa: अधिकाऱ्यांसोबत पाहणी: मंत्री फळदेसाईंची बांबर येथे भेट

दैनिक गोमन्तक

Ancient coins In Goa: नानोडा बांबर येथे विष्णू जोशी यांच्या खासगी जागेत सापडलेल्या पुरातन मध्ययुगीन नाण्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाईंनी खात्याचे संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सत्तरीतील नानोडा बांबर येथे बुधवारी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी विष्णू जोशी यांनी ती नाणी पुरातत्व खात्याकडे सुपूर्द केली.

ही नाणी गोव्याच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. ही नाणी आम्ही फक्त प्रदर्शनापुरतीच मर्यादित न ठेवता त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जाईल,असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

ही नाणी यंत्राद्वारे नव्हे, तर ती हाताने बनविण्यात आलेली आहेत. या नाण्यांचा अभ्यास करून ती कोणत्या काळातील आहेत, वापर कोणकोणत्या देशांत व्हायचा, कोणत्या राजाचे हे चलन होते, याचा अभ्यास करून सरकारला अहवाल सादर करण्यात येईल, असे मंत्री फळदेसाई यांनी दिली.

विष्णू जोशींचा होणार खास गौरव

नानोडा बांबर येथील ज्यांच्या जागेत ही नाणी सापडली आणि ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे ती सरकारच्या पुरातत्व खात्याकडे सुपुर्द केली. त्या विष्णू जोशींचा खास गौरव करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करणार असल्याचे मंत्री फळदेसाईंनी सांगितले. ही नाणी जरी तांब्याची असली तरी ती 500 वर्षांपूर्वीची आहेत.

त्यांना खूप मागणी आहे आणि मोठी रक्कम देऊन ती कोणी विकतही घेतली असती. मात्र, असे न करता प्रामाणिक हेतूने विष्णू जोशी यांनी ती पुरातत्व खात्याकडे सुपुर्द केली. त्यांची ही कृती महान असल्याचे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT