Goa | Anant Salkar Dainik Gomantak
गोवा

Anant Salkar Passed Away : अनंत साळकर यांचे गोमेकॉला देहदान; अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी

ज्येष्ठ पत्रकार अनंत साळकर यांचा मृतदेह सोमवार 10 ऑक्‍टोबर रोजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून दान करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Anant Salkar Passed Away : पिळगाव-डिचोली येथील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अनंत साळकर यांचा मृतदेह सोमवार 10 ऑक्‍टोबर रोजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून दान करण्यात आला. साळकर यांनी मृत्‍युपश्‍‍चात देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांच्या कन्या मेखला हिने आवश्‍‍यक प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी साळकर यांचे चाहते, मित्रमंडळी, नातेवाईक यांनी गोमेकॉत अंत्यदर्शन घेतले.

अनंत साळकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या परवानगीनुसार मृतदेह गोमेकॉ इस्पितळाकडे रविवारी सोपवण्यात आला होता. आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक, गोमेकॉ इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. शेखर साळकर तसेच फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख आंद्रे फर्नांडिस यांनी साहाय्य केले. देहदानाचा निर्णय झाल्याने मृतदेह पिळगाव येथे नेण्यात आला नाही. मात्र, काही वेळ बांबोळीतील गोमेकॉ शवागारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. साळकर यांचा देह शरीरशास्त्र (ॲनाटोमी) विभागाला सुपूर्द करण्‍यात आला. त्‍यांच्‍या निधनाने विविध क्षेत्रातील लोकांनी हळहळ व्‍यक्‍त केली.

पिळगाव- डिचोली येथील ज्येष्ठ आणि आधुनिक विचारांचे पत्रकार अनंत साळकर यांचे रविवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास गोमेकॉ इस्पितळातील अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान निधन झाले. ते गेले 8 दिवस मृत्यूशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने एका अनुभवी तसेच विविध क्षेत्राबद्दल अभ्यास असलेल्या पत्रकाराची पोकळी निर्माण झाली आहे. कुटुंबीयांच्या परवानगीनंतर त्यांचा देह गोमेकॉ इस्पितळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गेली 22 वर्षे पत्रकारितेत असलेले अनंत साळकर यांनी विविध वृत्तपत्रातून पत्रकारिता केली आहे. त्यांनी आपली पत्रकारिता ‘तरुण भारत’ वृत्तपत्रापासून सुरू केली. त्यावेळी ते या वृत्तपत्राचे आवृत्ती प्रमुख होते. त्यानंतर त्यांनी कोकणी वृत्तपत्र ‘सुनापरान्त’चे संपादक म्हणून काम पाहिले. गोव्यात ‘लोकमत’ वृत्तपत्र सुरू झाल्यानंतर ते 8 वर्षे सहायक संपादक होते. गेल्यावर्षी त्यांनी दै. ‘गोमन्तक’चे सहायक संपादक म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या मागे पत्नी अरुंधती व मुलगी मेखला असा परिवार आहे. शनिवारी, 1 ऑक्टोबर रोजी अनंत साळकर हे पणजी येथून आपल्या पिळगाव येथील घरी रात्री 9 च्या सुमारास परतत होते. चोडण फेरीबोटीतून ते पिळगाव दिशेने जात असताना रस्त्यावर त्यांच्या दुचाकीसमोर एक डुक्कर आडवे आले. त्यामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्यावर जोरात आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT