Chhatrapati Shivaji Maharaj  Dainik Gomantak
गोवा

Goa News: नेसायमध्ये शिवपुतळ्यावरून वाद

Goa News: गावात तणाव: मंत्र्यावर हल्ला; पंचायतीकडून काम बंदचा आदेश

दैनिक गोमन्तक

Goa News: सां जुझे द आरियाल (नेसाय) गावातील बेनाभाट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून रविवारी निर्माण झालेले तणावाचे वातावरण सोमवारीही कायम होते. या पुतळ्याचे अनावरण करून निघालेल्या समाजकल्‍याणमंत्री सुभाष फळदेसाई यांना अडविण्‍याचा प्रयत्‍न झाला.

यावेळी त्यांच्यावर काही महिलांनी पाठीमागून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्यावर मातीचे ढेकळे फेकून मारण्याचा प्रयत्न झाल्याने अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला.

बेनाभाटमध्ये स्थानिकांनी आज सकाळी शिवरायांचा पुतळाच या ठिकाणी नको, अशी भूमिका घेतली व ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. कोणतीही अनुचित गोष्ट घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळी मंत्री सुभाष फळदेसाई यांनी घटनास्थळाला भेट दिली असता स्थानिकांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा बहाणा केला. याचवेळी त्यांच्यावर मातीची ढेकळे फेकण्याचा प्रयत्न झाला. पण, उपस्थित शिवप्रेमींनी हा प्रयत्न अयशस्वी ठरवला. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करत जमावाला हटविले. यावेळी झालेल्या पान ११ वर

आमच्या मर्यादेचा अंत पाहू नये: फळदेसाई

सां जुझे द आरियाल येथे आज माझ्यावर जो हल्ला करण्यात आला, त्याची मी पोलिसात तक्रार दाखल केली नाही. कारण आज शिवजयंती आहे व या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून मी गप्प बसलो, पण याचा अर्थ समाजकंटकांनी मी घाबरलो असा घेऊ नये. जशास तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत व आमच्या मर्यादेचा कुणीही अंत पाहू नये, असा खणखणीत इशारा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी संध्याकाळी कुडचडेतील कार्यक्रमात दिला.

हे तर सामाजिक ध्रुवीकरण: पाटकर

आवश्यक परवानग्या घेतल्याची खात्री करूनच पुतळ्याची स्थापना करणे ही समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांची नैतिक जबाबदारी होती. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने भाजपने पुन्हा एकदा ‘ध्रुवीकरण’ सुरू केल्याचे दिसते. गोव्यात जातीय सलोखा राखण्यासाठी मी शांतताप्रिय गोमंतकीयांना नम्रपणे आवाहन करतो. फुटीरतावादी शक्तींना आपल्यात फूट निर्माण करू देऊ नका, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.

धार्मिक तणाव वाढवू नका

सां जुझे आरियल येथे झालेल्‍या दगडफेकीत आपल्‍याला कुठलाही जबर मार लागलेला नाही, असे स्‍पष्‍ट करत समाजकल्‍याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी या घटनेचा बाऊ करून आणखी कुणी इतर ठिकाणी अल्पसंख्याकांवर हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न करू नये, असे आवाहन फळदेसाई यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT