Cyber Crime Goa: 1.18 कोटींना गंडा घालणारा केरळात अटकेत; गोवा सायबर क्राईम पोलिसांची मोठी कारवाई

Cyber Crime Goa: सांकवाळ येथील ज्येष्ठाची तक्रार
Cyber Crime
Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Cyber Crime Goa: मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे भासवून दोन महिन्यांपूर्वी ऑनलाइन व्यवहाराद्वारे 1.18 कोटींना गंडा घालणाऱ्या केरळच्या अफलाल अब्दुनझर के. (27) याला सायबर कक्षाच्या पोलिस पथकाने शिताफीने अटक केली.

यासंदर्भात सांकवाळ येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक राजीव सहारिया यांनी सायबर कक्षाकडे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात तक्रार दाखल केली होती.

सायबर कक्षाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ठकसेनाने ऑनलाइन पद्धतीने केलेल्या व्यवहाराची माहिती अत्याधुनिक यंत्रणांच्या साहाय्याने मिळवली होती व त्याने वापरलेल्या मोबाईलची माहिती जमा केली होती.

तो समाज माध्यमाचा आधार घेऊन अशाप्रकारे ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. केरळ व तामिळनाडू येथे पथके पाठवण्यात आली होती. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत त्याला केरळ येथे अटक करण्यात आली.

Cyber Crime
Goa Crime News: प्रणव फडते प्राणघातक हल्ला प्रकरण! दोघे अटकेत; म्हापसा पोलिसांची कारवाई

संशयित अफलाल ऊर्फ अब्दुल याने दोन वेगवेगळ्या नावाने समाज माध्यमांवर अकाऊंट उघडले होते व त्याचा वापर गंडा घालण्यासाठी करत होता. त्याने तक्रारदार राजीव सहारिया यांना फोन करून तो मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याची ओळख दिली.

त्यांच्या नावाचे एक पार्सल क्राईम ब्रँचने ताब्यात घेतले असून त्यामध्ये अंमलीपदार्थविषयक पदार्थ तसेच मनी लाँडरिंगचा व्यवहार त्यांच्या बँक खात्यामधून झाल्याची माहिती दिली.

भयभीत झालेल्या सहारिया यांना त्याने हे प्रकरण मिटवण्यासाठी रक्कम पाठवावी लागले असे स्पष्ट केले व त्याला सहारिया यांनी तयारीही दाखवली.

क्राईम ब्रँचचा अधिकारी असलेल्या तोतया संशयिताने सहारिया यांना ऑनलाइन पैसे पाठवण्यास सांगितले. 11 ते 16 नोव्हेंबर 2023 या काळात सहारिया यांनी संशयिताला विविध ऑनलाइन व्यवहाराद्वारे खात्यामधून अनेकदा पैसे पाठवले.

सुमारे 1 कोटी 18 लाख 5 हजार 105 रुपये अनेकदा व्यवहार करून पाठवले. ही फसवणूक करण्यासाठी संशयिताने स्काईप कॉल्स व बँक अकाऊंट्ससाठी संगणकाचा वापर केला.

संशयिताने गंडा घातल्याचा प्रकार तक्रारदाराच्या उघडकीस आला, तोपर्यंत अनेक दिवस उलटून गेले होते. यासंदर्भातची तक्रार सहारिया यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये नोंद केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com