Majorda Junction Dainik Gomantak
गोवा

Majorda Junction: रेल्वे कामामुळे माजोर्डा नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

माजोर्डा रेल्वे स्टेशन जवळ दुरुस्ती व सिमेंटची भिंत बांधण्याचे काम सुरु केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Majorda Junction: माजोर्डा रेल्वे स्टेशन जवळ व रेल्वे रुळाच्या बाजुला रेल्वे खात्यामार्फत दुरुस्ती व सिमेंटची भिंत बांधण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे सर्वत्र माती व कचरा तिथेच टाकण्यात आलेला आहे. यावरुन माजोर्डा नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. माजोर्डातील नागरीक या ठिकाणी जमा झाले व त्यानी कामाला विरोध दर्शविला.

माजोर्डा, उतोर्डा, कलाता जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या चेअरमन करेन ब्रागांझा यांनी सांगितले की, 'विकास कामांना आमचा मुळीच विरोध नाही. पण ही कामे निसर्ग किंवा पर्यावरणाची वाट लावून आम्हाला नको आहे. पावसाळ्यापूर्वी रेल्वे अधिकारिणीने ही माती तसेच कचरा उचलावा.'

नाहीतर पावसाळ्यात पूरग्रस्त परिस्थिती उदभवण्याची शक्यता तसेच रस्त्यावर मातीचे थर होतील, रेल्वे रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जी तळी आहे ती प्रदुषित होण्याची भिती व्यक्त केली. आम्ही रेल्वे अधिकारिणीला पत्र लिहीले असून त्यांच्याकडुन अजून उत्तर आलेले नाही. जिल्हाधिकाऱ्याने मात्र संयुक्त पहाणी करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta Smart Glasses: "सावधान! तुमचे खाजगी क्षण कोणीतरी पाहतंय!" मेटा चष्म्यांनी टिपलेले व्हिडिओ होतायत लीक; केनियातील डेटा वर्कर्सचा धक्कादायक खुलासा

Morgan Stanley Layoffs: "70 अब्ज डॉलर्सचा नफा, तरीही नोकरीवर गदा!" मॉर्गन स्टॅनलीनं 2500 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; 'हे' कारण ठरलं नोकरी जाण्याचं

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Louis Berger Case: 'मी जेलमध्ये गेलो अन् खरे गुन्हेगार मंत्री झाले!' लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल आलेमाव कडाडले; राजकीय सूडबुद्धीने गोवल्याचा केला गंभीर आरोप

गोव्याचा फिरकीपटू मोहित रेडकर बीसीसीआय शिबिरात, हरभजन सिंग देणार 'गुरुमंत्र'

SCROLL FOR NEXT