Shripad Naik: गोव्यात सत्ताधाऱ्यांमध्ये 'मानापमान' नाट्य, 'झुआरी' उद्घाटनानंतर 'दोना पावला' येथेही केंद्रीय मंत्र्यांना डावलले

या जेटीच्या उद्‍घाटनाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री म्हणून आणि खासदार म्हणूनसुद्धा पर्यटन खात्याकडून निमंत्रण मिळाले नाही- श्रीपाद नाईक
Dona Paula Jetty
Dona Paula JettyDainik Gomantak
Published on
Updated on

Shripad Naik पर्यटन राज्य मंत्री रोहन खंवटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी (काल) प्रसिद्ध दोना पावला जेटी पर्यटकांसाठी खुली झाली. या जेटीच्या उद्‍घाटनाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री म्हणून आणि खासदार म्हणूनसुद्धा पर्यटन खात्याकडून निमंत्रण मिळाले नसल्याबद्दल श्रीपाद नाईक यांनी आपली भडास बाहेर काढली. याप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

झुआरी पुलावर व्यासपीठावर बोलविण्याचा नाट्य घडल्यानंतर आता दोना पावला जेटीच्या उद्‍घाटनासाठी निमंत्रण डावलण्याचा प्रकार घडला असल्याने खरोखरच नाईक यांच्याकडे कानाडोळा करण्याचा प्रकार सुरू आहे काय? अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे.

Dona Paula Jetty
Dona Paula Jetty : ‘सिंघम स्पॉट’ खुला; पर्यटकांना सशुल्क प्रवेश

उत्तर गोव्यात 2024 मध्ये भाजप नव्या उमेदवाराचा शोध घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे श्रीपाद नाईक यांचे नाव मागे पडत असल्याचे दिसत असले तरी त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com