An accident was averted in Ponda The students, however, were frightened Dainik Gomantak
गोवा

फोंडयातील अपघता टळला मात्र विद्यार्थी घाबरले

दैव बलवत्तर म्‍हणून बोटावरच निभावले...!

दैनिक गोमन्तक

फोंडा : ओपा-खांडेपार तिठ्यावर आज शनिवारी एका कारगाडीच्या चाकाखाली विद्यार्थाचे बोट सापडल्याने मोठा बाका प्रसंग उद्भवला. शेवटी स्थानिकांनी धावपळ करून पालकाच्या मदतीने या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये पोहचवले. हा अपघात सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.
गोव्यात पर्यटनासाठी बेंगलोर येथून आलेल्या केए 01 एमडब्ल्यू 4462 या क्रमांकाची कारगाडी परत बेंगलोरला जाताना खांडेपार तिठ्यावर रस्त्याच्या कडेला बसगाडीची प्रतीक्षा करीत थांबलेला विद्यार्थ्यांचा (students) घोळका अचानक समोर आल्याने हा अपघात घडला.

त्यातील यासीन टाकळी (11) या भूमिकानगर, तिस्क-उसगाव येथील विद्यार्थाचे बोट कारच्या चाकाखाली सापडत्याने तो जखमी झाला. अचानक झालेल्या या अपघातामुळे विद्यार्थी घाबरले. शेवटी स्थानिकांनी गाडी अडवली व विद्यार्थ्याला हॉस्पिटल (Hospital) मध्ये दाखल केले आहे. दरम्‍यान, या तिठ्यावर पदपथ बांधण्यात आला असला तरी प्रवासी निवारा शेड नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.

दरम्यान, केंद्रीय विद्यालयाने येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिली वर्ग प्रवेशासाठी 31 मार्चपर्यंत 6 वर्षे पूर्ण वयाची सक्ती केली आहे. या निकषाला मुंबई उच्च न्यायालयाच्या (court) गोवा खंडपीठात एका पालकाने आव्हान याचिका सादर केली आहे. खंडपीठाने प्राथमिक सुनावणीनंतर केंद्र सरकार आणि केंद्रीय विद्यालय संघटन यांना नोटीस बजावून त्यावरील सुनावणी 16 मार्चला ठेवली आहे.

ओल्ड गोवा (Old Goa) येथील स्वरा विष्णू लंगावत या मुलीच्या वतीने तिच्या पालकांनी याचिका सादर केली आहे. यात केंद्रीय विद्यालय संघटन, केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांना प्रतिवादी केले आहे. केंद्रीय विद्यालय संघटनच्या देशात पाचशेहून अधिक शाखा आहेत. गोव्यात त्यांची पाच विद्यालये आहेत. बांबोळी येथील केंद्रीय विद्यालयात (School) शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी मुलाचे वय 31 मार्चपर्यंत 6 वर्षे पूर्ण असणे सक्तीचे केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: मोहम्मद सिराजची कमाल! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा ठरला 25वा भारतीय

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT