Amit Shah visit in goa Dainik gomantak
गोवा

अमित शहांची पत्रकारांसह भाजप कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक

दैनिक गोमन्तक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वास्कोतील सभेत स्थानिक पत्रकारांना डावलण्यात आल्याने पत्रकारांत नाराजी पाहायला मिळाली. भाजपा कार्यकर्त्यांकडूनही स्थानिक पत्रकारांना तसेच भाजप कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिल्याने भाजपच्याच भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आज गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) प्रचारार्थ आगमन झाले. त्यानुसार त्यांनी दुपारी फोंडा व नंतर संध्याकाळी सावर्डे मतदार संघात दौरा करून भाजपा कार्यकर्त्यांची व मतदारांची भेट घेतली.

दरम्यान नंतर रात्री 8 वाजता मंत्री शहा यांचा वास्कोत येथील रेल्वे कम्युनिटी सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी कडक सुरक्षा तैनात ठेवण्यात आली होती. तसेच मोजक्‍याच भाजपा कार्यकर्त्यांना पास देण्यात आले होते व त्यांनाच सभागृहात प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे बाहेर कित्येक कार्यकर्ते ताटकळत उभे होते. त्यांना पोलीस गेटजवळ फिरकायला सुद्धा देत नव्हते.

दरम्यान सदर सभेला स्थानिक पत्रकार आले असता त्यांना गेटवर पोलिसांकडून अटकाव करण्यात आला. तसेच भाजपा प्रवक्त्यांकडून आत सोडण्यास सांगितले नसल्याचे सांगितले. तसेच गेटवर उभे असलेले स्थानिक भाजपा नगरसेवक आपली ओळख नसल्याचे भासवून पत्रकारांना तोंड फिरवून राहिले. नगरसेवक गिरीश बोरकर यांना विचारले असता त्याने स्थानिक पत्रकारांना आमंत्रण नसल्याचे सांगितले. तसेच त्याच्या जवळ असलेले पास यावेळी तो आपल्या निकटवर्तीयांना देत होता, मात्र पत्रकारांना त्याने डावलून लावले.

दरम्यान भाजपा राजकारणी सदस्य जयंत जाधव यांना फोन केला असता, आत मध्ये सीट फुल झाले असून आत मध्ये घेता येणार नसल्याचे सांगितले. ताटकळत उभे राहावे लागणार म्हणून, फोन कट केला. तसेच वास्को भाजपा उमेदवार यांना फोन केला असता त्याने ही आपणास आत मध्ये उभे रहावे लागले असल्याचे सांगितले. भाजपा मंडळाकडून स्थानिक पत्रकारांना दिलेल्या दुय्यम वागणुकीमुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त करून तेथून काढता पाय घेतला. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश नाकारल्याने वास्को भाजपा मंडळाच्या नावाने बोटे मोडीत तेथून निघून गेले.

मुरगांव तालुका भरारी पथकाकडून अमित शहा (Amit Shah) यांचे पोस्टर हटवण्यास भाग पाडले. आज केंद्रीय मंत्री अमित शहा वास्कोत येणार असल्याने कालपासून जोरकस तयारी चालू होती. येथील रेल्वे कम्युनिटी सभाग्रह वातानुकूलित करण्यात आले होते. तसेच बाहेरून सर्व सभाग्रह परिसर मोठे होर्डिंग्ज लावून बंद करण्यात आला होता. मुख्य दरवाजावर मोठे कमान उभे केले होते. दरम्यान रेल्वे ओव्हरर्ब्रीज जवळ व इतर ठिकाणी मंत्री शहा यांचे स्वागतार्थ त्यांचा फोटो असलेला व नाव असलेले होर्डिंग्ज लावण्यात आले होते.

मात्र हे सर्व निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे कृत्य असल्याने मुरगांव तालुक्यातील भरारी पथकाने सदर होर्डिंग्ज हटवले. त्यामुळे सभा सुरू होण्यापूर्वीच भाजपाकडून (BJP) आचारसंहितेचा भंग केल्याचे कृत्य त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT