गांधी घराणे नाही तर डबल इंजिन सरकारच करणार गोव्याचा विकास

यावेळी गोल्डन गोवा हवा असेल तर भाजपला पाठिंबा द्या असे आवाहन अमित शहा यांनी गोवेकरांना केले.
Amit Shah
Amit ShahTwitter/@bjp4goa
Published on
Updated on

भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे आज रविवारी दाबोळी विमानतळावर दुपारी आगमन झाले. गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांचे स्वागत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Pramod Sawant), केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राजशिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. (Amit Shah in Goa)

दरम्यान आजच्या गोवा दौऱ्याची सुरूवात अमित शहा यांनी बोरी-शिरोडा येथील साईबाबा मंदिराला भेट देऊन केली. त्यानंतर फोंडा येथे आजची पहिली प्रचारसभा घेतली. त्यानंतर सावर्डे येथे घरोघरी जावून प्रचार केला. सोबतच जनतेलाही संबोधित केले. संध्याकाळी वास्को येथे देखील जाहीर सभा घेवून गोव्यात डबल इंजिन सरकारचे महत्व पटवून सांगितले.

Amit Shah
दिगंबर कामत म्हणजे अव्यवस्था, अस्थिरता आणि अराजकता: अमित शहा

वाचा अमित शहा यांच्या गोवा दौऱ्याचे अपडेट्स

यावेळी गोव्यातील जनतेने वास्को येथिल सभेत अमित शहा यांच्यासोबत संवाद साधत स्टेबल सरकारचे महत्व काय असा प्रश्न विचारला. यावेळी अमित शहा यांना गोव्यातील युवक, महिला, आणि इतर सर्वसामान्य नागरिकांनी गोव्यात भाजपला मतदान का करावे असाही प्रश्न विचारला.

गोव्यात भाजपचे सरकार आल्यास गोव्यातील जनतेची रोजीरोटी असलेला खाण व्यवसाय सुरू करणार असे आश्वासन अमित शहा यांनी दिले. प्रमोद सावंत यांच्या सोबत बसून आम्ही खाणव्यवसाय सुरू करण्याची योजना आखत असल्याचे शहा यांनी सांगितले.

32 हजार कोटींचे काम भाजपने गोव्यात केले आहे. गोव्याच्या पर्यटन विकासासाठी भाजपने काम केले. गोव्यात कॉंग्रेसचे सरकार असताना गोवा विकासाच्या दृष्टिने अकराव्या स्थानि होता. आणि आता भाजप सरकारच्या कारकिर्दीत गोवा चौथ्या स्थानावर आहे.- अमित शहा

गोव्याला जनतेला महत्व देणारे सरकार हवे आहे. कॉंग्रेससारखे कुटूंबाला महत्व देणारे सरकार नको आहे. कॉंग्रेसने दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही. पण भाजपने दिलेली पुर्ण आश्वासनं पुर्ण केले. भाजप मोदीजींच्या नेतृत्वाखाली गोव्यात काम करत आहे. त्यामुळे गोवेकरांचा विकास करणे हेच भाजपचे ध्येय आहे.- अमित शहा

गोव्यात बाहेरून आलेले पक्ष गोव्याचा आणि गोवेकरांचा विकास करू शकणार नाही. कारण त्यांना गोव्याच्या समस्या आणि मुलभूत गरजा माहिती नाही, त्यामुळे कुणाला निवडून आणायचे हे आता गोवेकरांच्या हाती आहे.-अमित शहा

Amit Shah
अमित शहांसोबत मुख्यमंत्री सावंतांनाही गोव्यात मास्कचा विसर

वास्को येथिल सभेत गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची आठवण करत शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. गोव्यात मनोहर पर्रिकर यांचे स्वप्न पुझे नेण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

अमित शहा यांनी वास्को येथिल सभेत भाजपच्या विधानसभा निवडणूक प्रचार गीताचे अनावरण केले. गोवा सर्व दृष्टिने स्वंयंपुर्ण करण्याचे काम भारतीय जनता पार्टी करणार. गोव्यतील जनतेच्या हितासाठी, युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्याचे काम भाजप करणार असे आश्वासन प्रमोद सावंत यांनी आज वास्को येथे केले.

या प्रचारादरम्यान मात्र गोव्यातील भारतीय जनता पक्षाला कोविड नियमांचा विसर पडलेला दिसत आहे. घरोघरी प्रचार करत असताना अमित शहांसोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही कोविड नियमांचा फज्जा उडवत मास्क घालण्याचे टाळले.

मुखमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमुळेच गोव्याचा विकास झाला असून यावेळेलाही पंतप्रधानांचे हात बळकट करूया असे म्हणत गोव्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन सावर्डेमध्ये शहा यांनी दिले.

काँग्रेस, तृणमूल, आपने केवळ फसवी आश्वासने दिली आहेत. हे पक्ष सतेवर येणारच नाहीत त्यामुळे आश्वासन पूर्तीचा प्रश्नच उपस्थित होत नाही असे सांगून भाजप जे बोलतो ते करून दाखवतो असे अमित शहा म्हणाले.

भारतीय जनता पक्ष सरकारच्या माध्यमातून गोव्याचा विकास झाला आहे. आता समृद्धीकडे वाटचाल करताना गोल्डन गोवा संकल्पना साकारण्यासाठी भाजपला सहकार्य करा असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सावर्डेकरांना केले.

गोव्यातील कॉंग्रेस नेते दिगंबर कामत यांनी काय केले याचा हिशोब जनतेला द्यावा. भाजपचे सरकार आल्यावर मागच्या (2021)अर्थसंकल्पात गोव्याच्या विकासासाठी 2,567 कोटी जाहीर केले.- अमित शहा

गोवा एक शांत प्रदेश आहे. गेल्या दहा वर्षापासून गोव्याचा विकास होत आहे. गोव्याला एक सुंदर, समृद्ध राज्य बनवायचे आहे. यासाठी भाजप गोव्यात प्रयत्नशील आहे. भाजपने गोव्यातील जनतेला जे आश्वासन दिली ती पुर्ण बाहेरून आलेले नेते गोव्याचा विकास करू शकत नाही-अमित शहा

ज्या महिला मुख्यमंत्र्यांच्या राज्यात महिलांवरच अत्याचार होतो ती महिला गोव्याचा विकास करू शकत नाही. म्हणून गोव्यातील शांतादेवी मातेची तुलना पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जीसोबत करू नका, असे म्हणत प्रमोद सावंत यांनी तृणमूल कॉंग्रेसवर टिका केली. आणि सावर्डेकर भाजपला विकासाची एक संधी नक्की देणार असा विश्वास प्रमोद सावंत यांनी या प्रचारावेळी व्यक्त केला.

फोंडा पासून कोणकोणपर्यंत जो विकास झाला त्याचे श्रेय या भागातील सरपंचांचे आहे- प्रमोद सावंत

यावेळी अमित शहा यांच्यासोबत प्रचारादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील उपस्थित होते.

सावर्डेममध्ये घरोघरी जावून प्रचार करत असताना अमित शहा यांनी नागरिकांशी संवाद साधला.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी सावर्डेममध्ये घरोघरी प्रचार सुरू केला.

संध्याकाळी ते सावर्डे येथे घरोघरी जावून प्रचार करणार आणि त्यानंतर अम्ब्रेला रेल्वे हॉल, वास्को येथे प्रचारसभा होणार आहे.

फोंडा येथे झालेल्या प्रचारसभेत अमित शहा यांनी गोव्यातील कॉंग्रेस पक्षावर निशाना साधत दिगंबर कामत म्हणजे अव्यवस्था, अस्थिरता आणि अराजकता असे म्हणत कॉंग्रेसला फटकारले. गोवा देशाच्या नकाशावर जरी लहान दिसत असला तरी गोवा राज्याचे खूप मोठे महत्व आहे. देशाच्या नकाशावर गोवा एका सुरेख बिंदीसारखा दिसायला हवा यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com