Amit Shah Goa Visit Dainik
गोवा

Amit Shah Goa Visit: अमित शहा दोन दिवस गोवा दौऱ्यावर; रविवारी भाजप भवनाचा लोकार्पण सोहळा

Amit Shah Goa Visit September 2026: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवस गोवा दौऱ्यावर असतील.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवस गोवा दौऱ्यावर असतील. शनिवारी रात्री ते गोव्यात येतील. रविवारी (ता. ६) सायंकाळी ४ वाजता त्यांच्या हस्ते भाजप भवनाचा लोकार्पण सोहळा होणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांच्या बळावर रायबंदर-चिंबल बायपास येथे उभारण्यात आलेल्या भाजप भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला राज्यातील कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती लावावी, असे आवाहन दामू नाईक यांनी केले. ते पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळकर आणि उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दयानंद कारबोटकर उपस्थित होते.

दरम्यान, भाजपची जी घोडदौड सुरू आहे, त्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे योगदान दिले आहे. पक्षाकडून कोणत्याही तिकिटाची, पदाची अपेक्षा न करता राज्यातील सव्वाचार लाख सभासद कार्यरत असून, गोव्यातील भाजपच्या जडणघडणीत स्वर्गीय मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, राजेंद्र आर्लेकर, सतीश धोंड, दत्ता खोलकर, लक्ष्मीकांत पार्सेकर आदींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शहा हे सोमवारी सायंकाळी ५ वा. ते गोव्यातून प्रस्थान करतील.

वचनपूर्तीसाठी सरकारचे अभिनंदन

भाजपच्या जाहीरनाम्यात वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आली होती. ती घोषणा सरकारने गोवा उज्ज्वला योजना राबवत पूर्ण केली आहे.

या योजनेच्या अर्जाची प्रक्रिया अतिशय सुटसुटीत करण्यात आली आहे. गोमंतकीयांना दिलासा देणारी ही योजना अंमलात आणल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्रिमंडळाचे मी अभिनंदन करतो, असे दामू नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT