Amit Shah Rally In Goa Pramod Sawant twitter
गोवा

Amit Shah Rally In Goa: गृहमंत्री अमित शहा गोव्यात दाखल, गोमंतकीयांचे सभेकडे लक्ष

लोकसभा निवडणुकीसाठी फर्मागुढी येथे पहिलीच जाहीर सभा होत असून यात राज्यातील दोन्हीही मतदारसंघांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेला येणार आहेत.

Pramod Yadav

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा गोव्यात दाखल झाले आहेत. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शहा फार्मागुडी येथील सभेला संबोधित करण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. रणशिंग लोकसभेच्या प्राचाराचे असले तरी गोमंतकीय या सभेकडे विविध अर्थानी पाहत आहेत.

अमित शहा दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक देखील उपस्थित होते.

स्वागत झाल्यानंतर अमित शहा यांचा ताफा फार्मागुडीच्या दिशेने रवाना झाला आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी भाजप सत्तेवर आला, तरी देशभरात पक्षाला १६० जागांवर अत्यंत कमी मतांनी पराभव पत्करावा लागला होता. यात दक्षिण गोव्याच्या जागेचा समावेश होता.

म्हणून पक्षाच्या रणनीतीनुसार या सर्व जागांवर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विशेष लक्ष देण्यात येत आहे.

याचाच भाग म्हणून ज्येष्ठ नेते अमित शहा रविवारी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी फर्मागुढी येथे पहिलीच जाहीर सभा होत असून यात राज्यातील दोन्हीही मतदारसंघांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेला येणार आहेत.

या सभेसाठी 25 हजार कार्यकर्त्यांचे लक्ष्य ठेवले असून पक्षाचे पदाधिकारी, सर्व मंत्री, आमदार, चाळीसही मतदारसंघांचे मंडळ अध्यक्ष आणि सचिव उपस्थित राहणार आहेत. सभा संपल्यानंतर अमित शहा भाजपच्या सुकाणू समितीची बैठक घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT