Amit Patkar slams Speaker Ramesh Tawadkar
Amit Patkar slams Speaker Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Ramesh Tawadkar: इतरांना शिस्तीचा उपदेश करणाऱ्यांनी आधी आपले कर्तव्य पार पाडावे! अमित पाटकरांचा तवडकरांना टोला

Kavya Powar

Amit Patkar slams Speaker Ramesh Tawadkar

विधानसभा सभापती रमेश तवडकर आणि कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या वादात आता माजी मंत्री प्रकाश वेळीप यांची एंट्री झाली आहे. मंत्री गावडेंवर तवडकरांनी केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून यामध्ये कोणतीही शहानिशा करण्यात आली नसल्याचे वेळीप सांगून तवडकरांच्या भ्रष्ट कामाचा उल्लेख केला.

याबाबत मंत्री वेळीप यांनी आपला हक्कभंग केल्याचा दावा सभापती तवडकरांनी आज (ता.9) सभागृहात केला.

विरोधकांची सभापतींवर टीका..

प्रकाश वेळीप यांना आपण सभागृहात बोलवणार असून त्यांच्या विधानांबद्दल आणि त्यांनी केलेल्या आरोपांबद्दल जाब विचारणार असल्याचे सभापतींनी सांगितले. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, वृत्तपत्र स्वातंत्र्याचे नेहमीच संरक्षण करणे आवश्यक आहे. लोकशाहीत, घटनात्मक पदावरील व्यक्तीनेच पत्रकारांना धमकावताना पाहणे अत्यंत दुर्दैवी आहे. जे इतरांना शिस्तीचा उपदेश करतात त्यांनी विश्वासघातकी आणि पक्षांतर करणाऱ्यांविरुद्धच्या याचिकांवर निर्णय देण्याचे आपले कर्तव्य पार पाडताना त्याच शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे.

वेळीप यांचे तवडकरांवर शरसंधान

युनाटेड ट्रायबल अलायन्स (उटा)चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी पणजीत पत्रकार घेत थेटपणे तवडकर यांच्यावर शरसंधान केले. तवडकर हे आपल्या संस्थेसाठी सरकारकडून मोफत जागा मिळवतात, असाही त्यांचा आरोप आहे. बलराम संस्थेच्या शैक्षणिक संकुलावरील खर्चाबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. यामुळे गावडे, तवडकर, भाजप आणि विधानसभेपुरत्या मर्यादित विषयात ‘उटा’ने का उडी घेतली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सक्तीच्या नसबंदीला बळी पडलेल्यांना मिळणार नुकसान भरपाई; सरकारला आदेश

SCROLL FOR NEXT