Amit Patkar Slams CM Pramod Sawant government over water tanker used for sewage  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'हर घर नल' नव्हे, ही तर 'हर घर मल' योजना; अमित पाटकरांची सावंत सरकारवर घणाघाती टीका

सांकवाळ येथील रहिवाशांनी सांडपाणी वाहून नेणारा पाण्याचा टँकर पकडल्याच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट, बेजबाबदार आणि असंवेदनशील भाजप सरकार आणि अकार्यक्षम सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल हे 'हर घर जल' देण्यास सपशेल अपयशी ठरल्यानंतर आता 'हर घर मल'ची योजना राबवीत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

सांकवाळ येथील रहिवाशांनी सांडपाणी वाहून नेणारा पाण्याचा टँकर पकडल्याच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेस अध्यक्षांनी भाजप सरकारकडून कोणतीही आशा नसल्यामुळे लोकांनीच आता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सांडपाण्याने भरलेला पाण्याचा टँकर रंगेहाथ पकडणाऱ्या सांकवाळ येथील रहिवाशांचे मी अभिनंदन करतो. भाजप सरकार गोव्यातील सांडपाणी माफियांना प्रोत्साहन देत आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

गोव्यात कोणत्याही गोष्टीवर सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी आपली अकार्यक्षमता उघडपणे मान्य केली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे कर्नाटकात कन्नड बोलण्यात व्यस्त आहेत. गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने गोव्यात माफीयांना रान मोकळे झाले आहे, असा सणसणीत आरोप अमित पाटकर यांनी केला आहे.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने गोव्याला 100 टक्के ‘ओपन डेफिकेशन फ्री’ आणि 100 टक्के हर घर नल असलेले राज्य घोषित करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. वास्तव हे आहे की सरकारचे दोन्ही दावे जुमला असल्याचे सिद्ध झाले आहे.

भाजप सरकार आता "हर घर मल" (मानवी मलमूत्र) पुरवण्याच्या मोहिमेवर आहे. गोव्यातील जनतेने आता निर्धाराने हे अहंकारी भाजप सरकार पाडण्याची गरज आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT