Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

दिगंबर कामत आणि मायकल लोबोंविरोधात अपात्रता याचिका

दोन्ही नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका; प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची माहिती

आदित्य जोशी

पणजी : आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबोंविरोधात गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर प्रदेश काँग्रेस अपात्रता याचिका दाखल करणार आहे. गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ही माहिती दिली आहे. दोन्ही नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

यासोबतच काँग्रेसकडून मायकल लोबोंना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यामुळे सभागृहातील काँग्रेस आमदारांची आसनव्यवस्था बदलण्याची विनंती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि सहा आमदारांनी सभापती रमेश तवडकर यांना केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसकडून दोन्ही नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या गोव्यात सुरु आहे. असं असलं तरी दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत आपण पक्ष बदलला नसून अजूनही आपण काँग्रेसमध्येच असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मी काँग्रेसमध्येच मी रिटायर्ड हर्ट असलो तरी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच येत नाही पाठीमागच्या विधानसभेवेळी मी एकटा आमदार उरलो होतो. त्यामुळे पार्टी सोडण्याचा विषय येत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे आपण काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलो असून अजूनही काँग्रेससोबतच असल्याचा दावा लोबो यांनी केला आहे. मात्र काँग्रेसकडून बैठकांवर बैठका घेतल्या जात असून आपल्याला पदावरुन दूर केल्याचंही मायकल लोबोंनी स्पष्ट केलं आहे. तसंच सरकारमधील मंत्र्यांकडून आपल्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले जात असून आपल्यावर कारवाईही केली जात आहे. अशा परिस्थितीत आपण विरोधी पक्षनेतेपदी राहणं कठीण असल्याचं पक्षनेतृत्त्वाला कळवल्याचंही लोबोंनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT