Amit Patkar Mirabag Protest Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar: वाढदिनी पाटकर धरणे आंदोलनात! मिराबागवासीयांना दिला पाठिंबा; राज्य सरकारवर केली टीका

Amit Patkar Mirabag Protest: पाटकर म्हणाले, "येथील जनता रस्त्यावर बसून महिना उलटला तरी एकही सत्ताधारी लोकप्रतिनिधी त्यांची भेट घेण्यासाठी येत नाही, उलट त्यांना आतंकवादी घोषित केले जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे: प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी आपला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा न करता, कुडचडे येथील कार्यालयातून थेट मीराबाग येथे बंधाऱ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांसमवेत जाऊन त्यांचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी उपस्थितांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

पाटकर म्हणाले, "येथील जनता रस्त्यावर बसून महिना उलटला तरी एकही सत्ताधारी लोकप्रतिनिधी त्यांची भेट घेण्यासाठी येत नाही, उलट त्यांना आतंकवादी घोषित केले जाते. अशा परिस्थितीत आपला वाढदिवस साजरा करणे योग्य वाटत नाही; त्याऐवजी आंदोलकांसमवेत बसून त्यांच्या हक्कांसाठी न्याय मागणे योग्य आहे."

ते पुढे म्हणाले, "सामान्य जनता रस्त्यावर बसून आपल्या मागण्यांसाठी लढत आहे, पण सरकारच्या कानावर हाक पोहोचत नाही. विधानसभेत आवाज उठविल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना आतंकवादी म्हणतात.

सरकार एका बाजूने प्रकल्प रद्द करण्याचे सांगते, पण दुसऱ्या बाजूने जनतेला चिरडण्याची भाषा करते. यावेळी संकेत भंडारी यांनी पाटकर यांचे आभार मानले.

...त्यांची नावे उघड करा

पाटकर यांनी स्थानिक लोकांनी बंधारा आंदोलनासाठी महिनाभर बसले असताना, मंत्री काही लोकांना समजावले असल्याचे सांगत आहेत, हे लोक कोण आहेत, ही नावे मंत्र्यांनी स्पष्ट करावी, असे सांगितले. तसेच कोणालाही मत मांडता येईल, पण काँग्रेस सरकार आल्यावर हा बंधारा रद्द केला जाईल, असेही त्यांनी ठामपणे म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT