Amit Patkar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition: ‘आमदार अपात्रता याचिकेवर तातडीने सुनावणी घ्या, अन्यथा...’ सभापती तवडकरांना अमित पाटकरांचा इशारा

MLA Disqualification Petition: आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी विधानसभा सभापतींनी तातडीने घ्यावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी पुन्हा एकदा केली

Manish Jadhav

MLA Disqualification Petition: आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी विधानसभा सभापतींनी तातडीने घ्यावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी पुन्हा एकदा केली आहे. गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर माझ्या दुसऱ्या स्मरणपत्राची दखल घेतील. त्यांच्यासमोर प्रलंबित असलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर त्वरीत निर्णय देतील आणि लोकशाहीचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मला न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाण्यास भाग पाडणार नाहीत, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले.

गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांना आज सादर केलेल्या त्यांच्या दुसऱ्या स्मरणपत्रात काँग्रेस अध्यक्षांनी अपात्रता याचिकेवर तातडीने सुनावणी सुरु न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्याविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकेवर सभापतींनी निकाल दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी महिनाभरापूर्वी असेच एक स्मरणपत्र पाठवले होते. 2022 मध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या काँग्रेसच्या आठही पक्ष बदलणाऱ्या आमदारांविरुद्ध अमित पाटकर यांनी दाखल केलेली एक याचिका सभापतीसमोर प्रलंबित आहे. सभापतींनी अद्यापही या प्रकरणाची सुनावणी सुरु केलेली नाही. काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी आता सभापतींकडे सुनावणी जलद करुन याचिकेवर निर्णय देण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coffee Health Research: रोज कॉफी पिल्यास आयुष्य खरंच वाढतं? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती

Bandoda Jain Settlement: बांदोड्यातील प्राचीन जैन वस्ती आणि विजयनगर साम्राज्याचे सुवर्णयुग

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

Hardik Pandya New Look: हार्दिक पंड्याचा नवा अवतार चर्चेत; मुंडण करून महिका शर्मासोबत श्री वेंकटेश्वर स्वामींच्या चरणी नतमस्तक Watch Video

Santa Cruz BJP Office: बाबूश-रुडॉल्फमध्ये शब्दयुद्ध! सांताक्रुझमधील नवे कार्यालयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू

SCROLL FOR NEXT