MLA Disqualification Petition: कामत - लोबोंना दिलासा, पाटकरांना दणका; सभापतींनी अपात्रता याचिका फेटाळली

MLA Disqualification Petition: दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांचा इतर आमदारांसह जुलै २०२२ रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न फसला होता.
MLA Kamat & Lobo
MLA Kamat & LoboDainik Gomantak

MLA Disqualification Petition

मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दाखल केलेली अपात्रता याचिका सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळली आहे.

जुलै २०२२ रोजी लोबो आणि कामत यांच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी याचिका दाखल केली होती.

अमित पाटकर यांनी सभापतींच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केलीय. "सभापतींकडून याच प्रकारचा निर्णय अपेक्षित होता. यावर आम्ही आमचा पुढील कायदेशीर निर्णय घेऊ. सभापतींनी आता त्या आठ गद्दार आमदारांविरोधातील याचिकेवर सुनावणी सुरू करावी," अशी मागणी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

आमदार दिंगबर कामत आणि मायकल लोबो यांनी जुलै २०२२ मध्ये पक्षांतर करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी लोबो विरोधीपक्षनेते होते.

MLA Kamat & Lobo
Goa Politics: 'धर्म खतरे में है' म्हणत गोव्यात मते मागितली, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म नाही झाला- मनोज परब

पक्ष विरोधी भूमिका घेतल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अपात्रता याचिका अमित पाटकर यांनी दाखल केली होती. कामत आणि लोबो यांचा जुलैमध्ये फसलेला पक्षांतराचा सप्टेंबरमध्ये यशस्वी झाला.

काँग्रेसच्या आठ आमदारांनी सप्टेंबर २०२२ मध्ये भाजपमध्ये प्रवेश के ला होता.

कोण आहेत ते आठ आमदार

दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, आलेक्स सिक्वेरा, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com