MLA Sankalp Amonkar | Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

Sankalp Amonkar: अमित पाटकर पैसे देऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले; भाजप आमदार संकल्प आमोणकरांचा गंभीर आरोप

कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदुषणाला पाटकरच जबाबदार

दैनिक गोमंतक

Sankalp Amonkar: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी तिकीटासाठी पैसे दिले ही गोष्ट खरीच आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपद देखील पैसे देऊनच मिळवले आहे, असे गंभीर आरोप मुरगावचे भाजप आमदार संकल्प आमोणकर यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार आमोणकर म्हणाले की, अमित पाटकरांनी तिकीटासाठी पैसे दिले ही खरी गोष्ट आहे. त्यांनी पैसे देऊनच अध्यक्षपद मिळवले. त्यांना माहिती आहे त्यांनी कुणाकुणाला पैसे दिले ते. बंगळूरमध्ये त्यांनी हे डिलिंग केले. प्रदेश कार्यकारिणी वेगळी असते आणि निवडणूक समिती वेगळी असते. अमित पाटकरांनी केवळ पैशाचे राजकारण केले आहे.

काँग्रेस पक्षाते ते ज्या पदावर आहेत ते त्यांनी पैशातूनच मिळवले आहे. त्यांना काँग्रेसविषयी काही माहिती नाही. त्यांच्याप्रमाणेच इतरही अनेकांनी पैसे देऊन पदे मिळवली आहेत, पण मी त्यांची नावे घेणार नाही. त्यांनी आरोप केल्यावर त्यांना उघडे पाडू. आता मी त्या पक्षात नाही, मला भाजपमध्ये असल्याचा अभिमान आहे.

दरम्यान, अमित पाटकर यांनी आमोणकर यांनी कोळसा वाहतुकीबाबत मौन धारण केले आहे असा आऱोप केला होता, त्याबाबत विचारले असता आमोणकर म्हणाले की, धोकादायक कोळसा वाहतुकीला पाटकर हेच जबाबदार आहेत. एमपीटीने कोळसा वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

ही कोळसा वाहतूक उघड्यावर होऊ नये, याचीही काळजी घेतली जाते. तथापि, पाटकर हेच कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदुषणाला जबाबदार आहेत. आम्ही मार्ग बदलून दिला तरीही हे सुरूच आहे. आम्ही कोळशामुळे होणाऱ्या प्रदुषणाच्या विरोधात आहोत. आम्ही लोकांसाठी भांडतो. लोकांचे विषय़ मांडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT