Amit Palekar gets emotional as his family comes to meet him during his indefinite hunger strike in old goa Dainik Gomantak
गोवा

मुलीला आंदोलनस्थळी पाहून पालेकर भावुक!

उपोषणाचा दुसरा दिवस; शेवटपर्यंत लढा देणार

दैनिक गोमन्तक

पणजी: जुने गोवे (Old goa) वारसास्‍थळांचे संरक्षण व्‍हावे यासाठी गेल्‍या दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेले अॅड. अमित पालेकर (Amit Palekar) यांची पत्नी आणि लहान मुलीने भेट घेतली. यावेळी ते भावुक झाले. तसेच शेवटपर्यंत आपण लढा देणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

जुने गोवा येथील कॅजिटन चर्चजवळ सुरू असलेल्‍या बेकायदा बांधकामाच्या मालकाला जुने गोवा पंचायतीने काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. पालेकर यांनी पंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र जोपर्यंत नगरनियोजन खाते या बांधकामांना दिलेली परवानगी रद्द करत नाही, तोपर्यंत आपण बेमुदत उपोषण सुरू ठेवणार आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

अनेक लोकप्रतिनिधींनी आंदोलकांना पाठिंबा देऊनही सरकारने बेकायदा बांधकामांवर कारवाई केलेली नाही. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्यानंतर पंचायतीने काम थांबवण्याचे आदेश जारी केले. मात्र सरकार या प्रकरणी कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे, असा सवाल पालेकर यांनी उपस्थित केला. नगरनियोजन खात्‍याने एकदा काम रद्द करण्याची नोटीस जारी केली की किमान लोकांचा सरकारवर विश्वास तर बसणार आहे. त्यानंतर आम्ही या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करू, असे ते म्‍हणाले. या बेकायदा बांधकामाला परवानगी देण्यात संबंधित सर्व अधिकारी गुंतले होते, असा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT