Viral Video Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील किराणा दुकानात लटकलेल्या शॅम्पूच्या माळा पाहून अमेरिकन गोरा चक्रावला; म्हणाला, 'फर्स्ट टाईम...'

Viral Video: गावातील सौंदर्य न्याहाळत असताना त्याची नजर किराणा दुकानावर पडली आणि तो दुकानातील वस्तुंची ठेवण पाहून आश्चर्यचकित झाला.

Pramod Yadav

पणजी: इंटरनेटमुळे जग खूपच जवळ आले आहे. सोशल मिडियामुळे देश-विदेशातील लोक मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणं एक्सप्लोर करत आहेत. विदेशातील लोकांना गोव्याबाबत खास आकर्षण आहे. अमेरिकन रील स्टार गोव्याच्या ग्रामीण भागातील एक किराणा दुकान पाहून आश्चर्यचकीत झाला.

या अमेरिकन रील स्टारचे निक ग्रे @nickgraynews असे नाव असून तो कंटेंट क्रिएटर आहे. निक वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करत असतो. अलीकडेच निक भारतात आला होता. त्याने गोव्यातील एका गावाला भेट दिली. गावातील सौंदर्य न्याहाळत असताना त्याची नजर किराणा दुकानावर पडली आणि तो दुकानातील वस्तुंची ठेवण पाहून आश्चर्यचकित झाला.

निक ग्रे म्हणाला, दुकानात लटवलेले शॅम्पूचे छोटे पॅकेट यापूर्वी कधीच पाहिले नाहीत. याशिवाय मसाले, कॉफी, तेलाचे लहान पाकीटं त्यांन पहिल्यांदाच पाहिल्याचे तो म्हणाला.

याशिवाय एका सामान्य भारतीय किराणा दुकानात मिळणाऱ्या चिप्स, अंडी, नारळ, साबण यासारख्या वस्तू असल्याचे निक त्याच्या प्रेक्षकांना सांगताना रिलमध्ये दिसत आहे.

सध्या ही रिल मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, ४३ हजार लोकांनी याला लाईक केलं आहे तर, एक लाखाहून जास्त त्याला व्ह्युज मिळाल्या आहेत. देश - विदेशातील लोक यावर मत व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: ज्या स्वातंत्र्यासाठी गोमंतकीयांनी रक्त सांडले, त्याच 'गोव्यात' आज मूळ गोमंतकीयांना जगण्यासाठी देश सोडावा लागत आहे..

Goa News Live: गोवा इतर राज्यांच्या तुलनेत खूप पुढे; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पुत्रांचा अप्रत्यक्ष इशारा!

'मृतांमध्ये आमच्या 20 कर्मचाऱ्यांचा जीव गेला याचे दुःख'! लुथरा बंधूंनी पोलिसांसमोर मांडली बाजू; महिन्याला 25 लाख हफ्ता देत असल्याची चर्चा

SCROLL FOR NEXT