मोबाईलमध्ये बिझी आईंच्या हातातून बाळ निसटले, वाहत्या ओढ्यात कोसळले अन् अनर्थ झाला

Ponda News: मोबाईलला नेटवर्क नसल्याने महिला बाळाला घेऊन रुमच्या बाहेर आली.
मोबाईलमध्ये बिझी आईंच्या हातातून बाळ निसटले, वाहत्या ओढ्यात कोसळले अन् अनर्थ झाला
InfantDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: आई मोबाईलमध्ये व्यस्त असताना तिच्या हातातून बाळ निसटून वाहत्या ओढ्यात कोसळले. बाळाला शोधून बाहेर काढण्यात आले खरे पण तोपर्यंत उशीर झाला होता. गोव्याच्या उसगावातील नाणूस येथे गुरुवारी (०१ ऑगस्ट) सायंकाळी ही घटना उघडकीस आली.

शर्मिला देवी आणि तिचा पती प्रकाश उसगावातील एका शेतकी फार्म हाऊसवर कर्मचारी म्हणून काम करतात. ते मूळचे झारखंडचे रहिवासी आहेत.

शर्मिला देवी (२१) यांना आईला फोन लावायचा होता. मोबाईलला नेटवर्क नसल्याने महिला बाळाला घेऊन रुमच्या बाहेर आली. थोड्या अंतरावर नेटवर्क मिळाल्यानंतर त्या मोबाईलमध्ये व्यस्त झाल्या मात्र, याचवेळी बाळ निसटून वाहत्या ओढत्या कोसळले.

सततच्या मुसळधार पावसामुळे तुडुंब भरलेल्या ओढ्यात महिलेला बाळाचा शोध लागला नाही. अखेर तिने पतीला फोन करुन घडलेला प्रसंग कथन केला. पतीने घटनास्थळी धाव घेत ओढ्यात उडी मारुन बाळाला बाहेर काढले खरे पण त्याची शुद्ध हरपली होती.

१०८ ला फोन करुन रुग्णवाहिका बोलविण्यात आली, दरम्यान रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.

मोबाईलमध्ये बिझी आईंच्या हातातून बाळ निसटले, वाहत्या ओढ्यात कोसळले अन् अनर्थ झाला
Goa Rain Update: आज ऑरेंज अलर्ट, धरणांत मुबलक पाणी; वाळपईत सर्वाधिक पाऊस

मडगावातील दक्षिण जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर फोंडा पोलिसांनी बाळाचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, पीएसआय सुशांत गावकर अधिक तपास करत आहेत.

आई भानावर आली अन्...

गुरुवारी राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्यामुळे सगळीकडे पाणी झाले होते. नाणूस येथील नालाही पाण्याने तुडुंब भरला होता. हा चिमुरडा नाल्याकडे गेल्यानंतर पाय घसरून पाण्यात पडला आणि बुडाला. इकडे त्याची आई शर्मिलादेवी हिचे मोबाईलवरील बोलणे संपल्यानंतर तिला मुलगा नाहीसा झाल्याचे लक्षात आले आणि एकच गोंधळ उडाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com